बॉलिवूडच्या दिग्गज फॅशन डिझायनरवर कोसळला दुःखाचा डोंगर; सांत्वनासाठी बड्या बॉलिवूडकरांची रांग
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क March 20, 2026 10:43 AM

Designer Manish Malhotra Mother Passed Away: दिग्गज बॉलिवूड (Bollywood News) फॅशन डिझायनर (Bollywood Fashion Designer) मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  मनीष मल्होत्रा यांना मातृशोक झाला असून त्यांची आई गरिमा मल्होत्रा (Garima Malhotra) ​​यांचं निधन झालंय. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, यामुळे संपूर्ण बॉलिवूड विश्वात, तसेच मनीष मल्होत्रा यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सर्वांच्याच लाडक्या असलेल्या या डिझायनरसाठी हा अत्यंत कठीण काळ आहे. दरम्यान, मनीष मल्होत्रा यांच्या सांत्वनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींची (Bollywood Celebrity) मांदियाळी दिसतेय. 

गरिमा मल्होत्रा (Garima Malhotra Mother Passed Away) ​​यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), मलायका अरोरा (Malaika Arora), अर्जुन कपूर (Arjun Kapoor), करिश्मा कपूर (Karisma Kapoor), सोनाली बेंद्रे (Sonali Bendre), उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) आणि फातिमा सना शेख यांसह अनेक सेलिब्रिटी मनीष मल्होत्रांच्या सांत्वनासाठी त्यांच्या मुंबईच्या घरी पोहोचले. मुंबईतील एका प्रतिष्ठित परिसरात मनीष मल्होत्रा आपल्या आईसह एका आलिशान घरात राहायचे. 


वरुण धवनही मनिष मल्होत्रा यांना भेटण्यासाठी आपल्या पत्नीसह आला होता. अभिनेत्री नुश्रत भरुचाही सांत्वन व्यक्त करण्यासाठी आलेली. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीही मनीष मल्होत्रांच्या घराबाहेर स्पॉट झाले. अभिनेता करण टॅकरही मनीष मल्होत्रांच्या निवासस्थानी आला. अभिनेता संजय कपूर आपल्या कुटुंबासह उपस्थित राहिला. अभिनेत्री करिश्मा कपूरनंही मनीष मल्होत्रांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

मनीष मल्होत्रांच्या आईवर अंत्यसंस्कार केव्हा केले जाणार? 

मनीष मल्होत्रा ​​यांच्या टीमनं एक अधिकृत निवेदन जारी केलंय. त्यांनी मनीष मल्होत्रा ​​यांच्या आईच्या अंत्यविधीबाबतची सविस्तर माहितीही दिली आहे. त्या निवेदनात म्हटलंय की, "एक सुंदर आणि परिपूर्ण आयुष्य जगल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, आम्ही आमच्या प्रिय आई, श्रीमती गरिमा मल्होत्रा ​​यांच्या वयाच्या 94 व्या वर्षी झालेल्या निधनाची बातमी आपल्याशी शेअर करत आहोत. त्या आपल्या मागे अनेक गोड आठवणी, पिढ्यान् पिढ्यांचं प्रेम आणि आम्हाला सदैव मार्गदर्शन करणारा एक समृद्ध वारसा ठेवून गेल्या आहेत. त्यांचा अंत्यविधी 20 मार्च रोजी सकाळी 10 वाजता पार पडेल. हे अंत्यसंस्कार सांताक्रूझ पश्चिम येथील हिंदू स्मशानभूमीत केले जातील..."

मनीष मल्होत्रा ​​यांच्याबद्दल बोलायचं झालं तर, सिनेसृष्टीतल्या दिग्गज सेलिब्रिटी फॅशन डिझायनर्समध्ये दिमाखात समाविष्ट होणार नाव. मनीष मल्होत्रा उत्तम सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आहेतच, त्यासोबत ते सिनेनिर्मातेही आहेत. त्यांनी अनेक लोकप्रिय सिनेमांमधील आघाडीच्या कलाकारांसाठी कॉस्ट्यूम्स डिझाइन केले आहेत. मनीष मल्होत्रा आपल्या क्लासी आणि ग्लॅमरस डिझायनर आऊटफिट्ससाठी ओळखले जातात. त्यांनी सिद्धार्थ आणि कियारा यांसारख्या अनेक लोकप्रिय कलाकारांसाठी वेडिंग आऊटफिट्स डिझाइन केले आहेत. याव्यतिरिक्त, मनीष यांनी 'गुस्ताख इश्क', 'फॅशन', 'बन टिक्की' आणि 'साली मोहब्बत' यांसारख्या चित्रपटांची निर्मितीही केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.