पंचांग -
शुक्रवार : चैत्र शुद्ध २, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ६.३९ सूर्यास्त ६.४४, चंद्रोदय सकाळी ७.१६ चंद्रास्त रात्री ८.०७, चंद्रदर्शन, बालचंद्रमाव्रत, स्वामी समर्थ प्रगट दिन, भारतीय सौर फाल्गुन २९ शके १९४८.
दिनविशेष -
२००९ - भारताची ग्रॅण्डमास्टर कोनेरू हंपीचे पहिल्या आयएस बॅंक अतातुर्क महिला ग्रांप्री बुद्धिबळ स्पर्धेत विजेतपद.
२०११ - भारताच्या साईना नेहवालने इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील अपयश पुसून टाकत ‘स्विस’ खुल्या ग्रॅंड प्रिक्स स्पर्धेत विजेतेपद मिळविले.
२०१५ - नागालॅंडच्या ज्येष्ठ लेखिका आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा तेमसुला आओ यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्काराने गौरविले.