Maharashtra Live News Update: पुण्यात स्पीड आणि पॉवर पेट्रोलच्या किंमती मध्ये वाढ
Saam TV March 20, 2026 10:45 AM
Jalna: जालन्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे गहू भुईसपाट, शेतकऱ्याला अश्रू अनावर ..

जालना जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास अनेक भागात गारांसह पाऊस पडला या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू पिकासह फळबागांचा अतोनात नुकसान झाल आहे.जालना तालुक्यातील सिरसवाडी येथील शेतकरी अशोक सातभाये यांचं गहू पीक अक्षरशः भुई सपाट झाला आहे.हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हरवल्याने शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले आहे. जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये गारांसह पाऊस झाल्यामुळे गहू पिकांसह कांदा आणि फळबागांचा अतोनात नुकसान झाला आहे.

Pune: पुण्यात स्पीड आणि पॉवर पेट्रोलच्या किंमती मध्ये वाढ

स्पीड आणि पॉवर पेट्रोलच्या किंमती मध्ये वाढ

साध्या पेट्रोल मध्ये कुठली ही भाववाढ नाही

प्रत्येक लिटर मागे २.०९ रुपयांनी वाढले भाव

१११.६८ रुपये स्पीड आणि पॉवर पेट्रोल चे जुने दर

११३.७७ स्पीड आणि पॉवर पेट्रोल चे नवीन दर

दोन्ही प्रकारच्या पेट्रोलची दरवाढ आजपासून लागू

Gadchiroli: गडचिरोलीत भामरागड अंतर्गत अतिदुर्गम बंगाडी येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना

गडचिरोली जिल्ह्याच्या उपविभाग भामरागड अंतर्गत अतिदुर्गम बंगाडी येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना

1000 सी–60 कमांडो, 18 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने 24 तासात उभारले नवीन पोलीस मदत केंद्र

विशेष पोलीस महानिरीक्षक (नविअ) नागपूर संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल व इतर वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले नवीन पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन

सन-2023 पासूनच्या सुरक्षा पोकळी कमी करण्यासाठीच्या साखळीमधील 11 व्या नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना

अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी...

अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी...

राहाता, श्रीरामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस...

अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात...

हाताशी आलेल्या पिकांना वाचविण्याचे संकट

परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊसाची भुरभुर

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार परभणी जिल्ह्यात वादळी वारा विजांच्या कडकडाटासह पाऊसाची हजेरी लावली. अचानक जोरदार वारा सुटल्याने पावसाने मात्र शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या गव्हाचे ज्वारी चे नुकसान होण्याची शक्यता आहे .

nashik-yeola-सुंदर राम मंडळाची गुडी पाडव्याच्या निमित्ताने रथ मिरवणूक

हिंदू नववर्ष व गुडीपडव्या निमित्ताने नाशिकच्या येवला शहरात रात्री बालाजी गल्लीतील सुंदर राम मंडळा तर्फे श्रीराम,लक्ष्मण,सीता यांची शहरातून रथातून मिरवणूक काढण्यात आली,नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांच्या हस्ते रथ ओढण्यात येऊन रथ मिरवणुकीला सुरवात झाली,या मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या,तर विठ्ठल-रुखमाई चे वेष परिधान केलेले बालक मिरवणुकीत सहभागी झाले होते,रात्री उशिरा पर्यंत ही रथ मिरवणूक शहरातील विविध भागातून फिरून पुन्हा बालाजी गल्लीतील मंदिरात पोहचली.

पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

पालघर जिल्ह्यातील चारोटी परिसरात वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला असून 11 केव्ही वीज वाहिनीचा डीपी थेट घरावर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत वीज पोल आणि डीपी कोसळून घराचे मोठे नुकसान झाले असून परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.