पोलिसांनी अटक केलेल्या भोंदूबाबा अशोक खरातविरोधात अंधश्रध्दा निर्मूल समितीही आक्रमक झाली आहे. समितीचे पदाधिकारी एसआयटी प्रमुखांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.
चाकणकर फरार कशा होऊ शकतात?- तृप्ती देसाईरुपाली चाकणकर फरार असल्याचे पोस्ट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई म्हणाल्या की,रुपाली चाकणकर फरार कशा काय होऊ शकतील? त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा त्यांच्या विरोधात अटक वॉरंट नाही, परंतु माध्यमांसमोर येऊन सर्वकाही सत्य त्यांनी मांडले पाहिजे.
रुपाली चाकणकरांना नार्को टेस्ट करा - अंधारेमहिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अशोक खरातच्या सर्व गुन्ह्यांची माहिती होती. त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार सुषमा अंधारे यांनी केली आहे. तसेच चाकणकर यांनी तातडीने राजीनामा द्यावे, असे देखील त्यांनी म्हटले.
अशोक खरातच्या मध्यस्थीने सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्याअनेक बडे सरकारी अधिकारी अशोक खरातच्या दरबारात जात होते, असे वृत्त साम टिव्हीने दिले आहे. चॉईस पोस्टिंगसाठी, बदलीसाठी हे अधिकारी खरातकडे जात होते, तसेच कामांच्या बदल्यात खरातला जमिनीत गुंतवणुकीच्या स्वरूपात ‘दक्षिणा’ दिली जात असल्याचीही चर्चा आहे.
रुपाली चाकणकरांची तात्कळ हकालपट्टी करा - अंजली दमानियामहिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची तात्काळ हकालपट्टी करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे, दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात याच्यासोबतचे चार फोटो शेअर करत अशा Epstein बाबांवर इतकी मेहेरबानी ? ह्या महिला आयोगाच्या अध्यक्षा ? ह्या रुपाली चाकणकरांची तत्काळ पदावरून हकालपट्टी करा असे म्हटले आहे.
पावसाने शेतकरी अडचणीत, मदतीची मागणीअवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. ते म्हणाले, नैसर्गिक संकट राज्यातील शेतकऱ्यांच्या कायमच पाचवीला पुजलं असून राज्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशीव, कोल्हापूर, अकोला, सांगली, अहिल्यानगर, परभणी, बुलढाणा, नाशिकसह इतरही जिल्ह्यात गहू, ज्वारी, कांदा, द्राक्ष, कलिंगडसह अन्य पिकांचं अतोनात नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला गेल्याने शेतकरी हवालददिल झाला आहे. या सर्व नुकसानीचे सरकारने तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, ही विनंती!
...तर महाराष्ट्रातील सरकार पडेलअशोक खरात प्रकरण हे महाराष्ट्रातील एपिस्टीन फाईल प्रकरणापेक्षाही भयंकर प्रकरण आहेत. जर पोलिसांनी 58 व्हिडिओ समोर आणले तर महाराष्ट्रातील सरकार कोसळेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
रुपाली चाकणकर फरारअशोक खरात प्रकरणामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणी होत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधील रुपाली पाटील ठोंबरे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली, अशी फेसबूकवर पोस्ट केली आहे.
आम्हाला डांबून ठेवलं, निकम यांचा दानवेंवर आरोपअंबादास दानवे यांनी परस्पर आमचा सौदा केला. चार दिवस आम्हाला डांबून ठेवलं, आम्ही कुठलीही गद्दारी केली नाही, की भाजपाशी हातमिळवणी केली नाही, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी केला.
अशोक खरातच्या कुटुंबीयांची मुजोरी, पत्रकारावर फेकल्या चपल्याअशोक खरात या अत्याचारी भोंदू बाबाच्या कुटुंबीयांनी मुजोरीची परिसीमा गाठली आहे. त्यांच्या आलिशान बंगल्यातून बाहेरील पत्रकारांवर चपलांचा मारा करत पत्रकारांना कुत्र्याचा धाक दाखवायचा प्रकार खरात कुटुंबीयांनी केला आहे, या विषयी ट्विट करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खरात कुटुंबीयांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.