जागतिक अस्थिरता आणि ग्लोबल बाजारातील चढ-उतार सुरु असताना शुक्रवार २० मार्च रोजी सोने आणि चांदीच्या किंमतीत संमिश्र चढ उतार पाहायला मिळाला. चांदीने कालच्या मोठ्या घसरणीनंतर हलकी रिकव्हरी नोंदवली तर सोन्याची किंमतीतील घसरणीचा सिलसिला लागोपाठ तिसऱ्या दिवशीही कायम राहिली.
चांदीत तेजीऑल इंडिया सराफ असोसिएशनच्या मते चांदीच्या किंमतीत सुमारे १,८०० रुपये प्रति किलोग्रॅमची वाढ नोंदली गेली. ज्यानंतर चांदी २,४०,५०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली. याआधी गुरुवारी चांदीचा भाव २,३८,७०० रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता. मात्र, ही उसळी मर्यादित राहीली आणि बाजारात दबाव अजूनही कायम आहे.
सोने झाले स्वस्तदुसरीकडे सोने गुंतवणूकदारांना दिलासा देण्यात नाकाम झाले. ९९.९ टक्के शुद्ध सोने ६५० रुपयांच्या घसरणीसह १,५२,६५० रुपये प्रति १० ग्रॅमवर आले. या आधी ते १,५३,३०० रुपये प्रति ग्रॅमवर बंद झाले होते. लागोपाठ तिसऱ्या दिवशी झालेल्या घसरणीने सोन्यावर दबाव कायम असल्याचे संकेत मिळत आहेत.
तज्ज्ञांचे मत काय ?तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोन्याची किंमतींवर जागतिक आर्थिक परिस्थिती आणि डॉलरची मजबूतीचा परिणाम स्पष्ट दिसत आहे. HDFC सिक्योरिटीजचे ज्येष्ठ विश्लेषक दिलीप परमार यांच्या मते अमेरिका-इस्राईल -इराणच्या दरम्यान वाढत्या तणावामुळे गुंतवणूकीचा कल सुरक्षित मानल्या जाणाऱ्या डॉलर आणि कच्च्या तेलाकडे वळवले आहे. ज्यामुळे सोन्याची मागणी प्रभावित झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती ?आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता तेथेही मौल्यवान धातूच्या किंमती स्थिर नाहीत. स्पॉट सिल्व्हर सुमारे १ टक्के घसरुन ७२ डॉलर प्रति औंसच्या आसपास ट्रेंड करताना पाहायला मिळाले. तर सोने हलक्या वाढीसह ४,६६३ डॉलर प्रति औसवर कायम राहिले. हे दर्शवते की जागतिक स्तरावर देखील गुंतवणूकदार अजूनही सावधानता बाळगत आहेत.
मागणीत का कमी आली ?मार्केट एक्सपर्ट्सच्या मते अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या कठोर धोरणाने कमोडीटी बाजारावर दबाव आला आहे. व्याजदरातील अनिश्चितता आणि संभाव्य दरवाढीच्या संकेताने गुंतवणूकदारांना जोखीम घेण्यापासून रोखले आहे. तसेच जास्त व्याजदराने बॉण्ड यील्ड आकर्षक होत आहेत. ज्यामुळे सोने सारख्या विनाव्याजाच्या गुंतवणूकीची मागणी घटली आहे.
आता पुढे काय होणार ?येणाऱ्या काळात जानकारांच्या मते सोने आणि चांदी दोन्ही चढ उतार पाहायला मिळू शकतो. महागाई, व्याजदर, कच्च्या तेलाच्या किंमती आणि जिओ – पॉलिटीकल घटनाक्रम या सर्व फॅक्टरना मिळून किंमती निश्चित होणार आहेत. सध्या सोन्यात कमजोरी आणि चांदीत मर्यादित प्रमाणात चढ- उतार पाहायला मिळू शकतो.