खरीप हंगामातील तुरीचा हंगाम संपला असून तुरीची काढणी संपताच शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी बाजारात आणायला सुरुवात केलीये नव्याने दरात थोडी सुधारणा झाली असून सुरूवातीला सहा हजार 420 रूपये क्विंटल दराने विकली जाणारी तूर आता 7 हजार आठशे रूपये क्विंटल एवढा भाव मिळत आहे.त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात तुरीच्या दराची आठ हजार रूपयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
Yavatmal: यवतमाळमध्ये गॅसची ऑनलाईन सेवा विस्कळीत, नागरिक त्रस्तयवतमाळ जिल्ह्यात सध्या मुबलक प्रमाणात गॅस सिलेंडर उपलब्ध असल्याच्या वल्गना प्रशासनाकडून केल्या जाताहेत, दिवसभर ऑनलाईन सेवा ठप्प राहते तर पहाटे पाच ते सात या वेळेत बुकिंग केल्या जातेय परंतु बुकिंग केल्यानंतरही सिलेंडरची प्रतीक्षा कायम आहे.परिणामी ग्राहक थेट गॅसएजन्सी समोर सिलेंडर साठी रांगा लावत आहे या प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Pune: दहशत माजविणाऱ्या गुंडांचा माज उतरवलापुण्यात दहशत माजविणाऱ्या गुंडांचा माज उतरवला
हात जोडून माफी मागायला लावली..
कोंढवा बुद्रुक परिसरात मंगळवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या १२ तरुणांच्या टोळक्याने चांगलाच राडा घातला. या
टोळक्याने केवळ रॅश ड्रायव्हिंगच केले नाही,तर रस्त्याने जाणाऱ्या एका बँक कर्मचाऱ्याला आणि एका कुरिअर बॉयला कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून परिसरात दहशत निर्माण केली.
गाड्यांची तोडफोड आणि नागरिकांना शिवीगाळ केवळ मारहाण करून हे टोळके थांबले नाही,तर त्यांनी गल्ली क्रमांक ११ मध्ये पार्क केलेल्या गाड्यांचेही नुकसान केले.
स्थानिक रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकीची या टोळक्याने तोडफोड केली. यावेळी परिसरात उभे असलेल्या नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता,आरोपींनी त्यांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली.
Navi Mumbai: नवी मुंबईत हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक धोकादायक पातळीवरनवी मुंबई -
नवी मुंबईत हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक धोकादायक पातळीवर
सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडला ॲक्शन प्लॅन प्रदूषणाचा होणार बिमोड हवेची गुणवत्ता सुधारणार
Hingoli: हिंगोलीच्या सराफा मार्केटमध्ये 2 गटात हाणामारीहिंगोली -
हिंगोलीच्या सराफा मार्केटमध्ये 2 गटात हाणामारी
दोन दिवसांपूर्वी झालेल्या मारहानीचा व्हिडीओ व्हायरल
परस्परांच्या तक्रारीवरून एकमेकांविरोधात गुन्हे दाखल