पंचांग -
शनिवार : चैत्र शुद्ध ३, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.३९ सूर्यास्त ६.४४, चंद्रोदय सकाळी ७.५६ चंद्रास्त रात्री ९.०८, गौरी तृतीया (तीज), मत्स्य जयंती, विषुवदिन, मु. शब्बाल मासारंभ, रमजान ईद, भारतीय सौर फाल्गुन ३० शके १९४८.
दिनविशेष -
२००१ - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन गौरविले.
२००९ - हॅमिल्टन येथे कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाने ३३ वर्षांनी न्यूझीलंडमध्ये कसोटी सामना जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.
२०१० - भारताकडून ब्राह्मोसच्या स्वनातीत क्षेपणास्त्राची ओडिशाच्या किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरात यशस्वी चाचणी. हे क्षेपणास्त्र विकसित करणारे भारत जगातील पहिले राष्ट्र ठरले.