नवी दिल्ली : रेमंड ग्रुपचे चेअरमन व एमडी गौतम सिंघानिया (Gautam Singhania) हे काल (शुक्रवारी) मालदीवमध्ये स्पीड बोट उलटल्याने जखमी झाले. या बोटीत सिंघानियांसह (Gautam Singhania) सात जण होते. त्यांना तत्काळ विमानाने मुंबईत आणण्यात आले. त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर रॅली ड्रायव्हर हरिसिंगसह दोन भारतीय बेपत्ता आहेत, तर तिघे जखमी झाले आहेत. हा अपघात मालदीवच्या फेलिधू भागात गुरुवारी रात्री ११च्या सुमारास झाला. सिंघानिया (Gautam Singhania) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर बोटीतील पाच जण वाहून गेले होते. यात एक रशियन महिला व चार भारतीय पुरुषांचा समावेश होता.
दरम्यान, मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्सच्या कोस्ट गार्डनुसार, समुद्रातील उंच लाटांमुळे बेपत्ता प्रवाशांचा शोध घेणे कठीण होत आहे. बोटीतील एका प्रवाशाचा हात तुटला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. गौतम सिंघानिया व हरिसिंग हे दोघे मित्र असून दोघांनाही अॅडव्हेंचर स्पोर्ट्सचा छंद आहे.(Gautam Singhania)
मालदीवमधून समोर आलेल्या वृत्तानुसार, पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीडबोट शुक्रवारी पहाटे ‘व्ही फेलिधू’ जवळ उलटली. स्पीडबोटवर सात जण होते. त्यात यूके आणि रशियातील दोन महिला तसेच भारतातील पाच पुरुषांचा समावेश होता. या अपघातात पाच जण समुद्रात वाहून गेले, त्यात रशियातील एक महिला आणि भारतातील चार पुरुषांचा समावेश आहे.
गौतम सिंघानिया देखील पर्यटकांमध्ये होते. रॅली चालक हरी सिंग यांसह आणखी दोन भारतीय पुरुष बेपत्ता असल्याचे समजते आणि शोध मोहीम सुरू आहे. सिंघानिया यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या घटनेला दुजोरा देताना सिंघानिया यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले, ‘एका दुर्दैवी अपघातात गौतम सिंघानिया यांना किरकोळ दुखापत झाली आहे. ते मुंबईत योग्य देखरेखीखाली उपचार घेत आहेत.’
गौतम सिंघानिया यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना काही किरकोळ दुखापती झाल्या आहेत; मात्र आता त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे.
गौतम सिंघानिया यांना ॲडव्हेंचर स्पोर्ट्स खेळण्याचे शौक आहेत. रेमंड समूहाचा व्यवसाय वस्त्रोद्योग, रिअल इस्टेट, इंजिनिअरिंग आणि कन्झ्युमर केअर यांसारख्या क्षेत्रांमध्ये विस्तारलेला आहे. गौतम सिंघानिया यांची एकूण संपत्ती ११,००० कोटी रुपयांहून अधिक आहे.