भोकरद : कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकीचा खदानीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना पंढरपूर वाडी (ता. भोकरदन) परिसरात शुक्रवारी (ता.२०) दुपारी उघडकीस आली.
कावेरी दशरथ मोहिते (वय ३०) व तिची मुलगी सोनाली दशरथ मोहिते (१२) अशी मृतांची नावे आहेत. या दोघी कपेडे धुण्यासाठी घराबाहेर पडल्या. बराच वेळ उलटूनही त्या घरी न परतल्याने पती दशरथ मोहिते यांनी त्यांचा शोध सुरू केला.
Jalna News: जालना जिल्ह्यात मुली-महिलांसाठी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा – २२ मार्चखदान परिसरात गेल्यावर त्यांना काठावर कपडे, चपला आढळल्या. ग्रामस्थांनी खदानीतील पाण्यात शोध घेतला असता दोघींचे मृतदेह आढळले.
Premium Petrol: युद्धाच्या छायेत इंधनदर भडकले; प्रीमियम पेट्रोल आणि डिझेल महाग, ‘एलपीजी’बाबत चिंता वाढलीहसनाबाद पोलिसांनी पंचनामा केला. भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर दोन्ही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोनाली ही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सहावीमध्ये होती. ती अभ्यासू, नम्र होती. माय-लेकीच्या अकाली मृत्यूने पंढरपूरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.