तत्कालिन उपराष्ट्रपती जगदीप धनखडांचा तडकाफडकी राजीनामा का घेतला? संजय राऊतांच्या पुस्तकातून सनसनाटी गौप्यस्फोट
सोमेश कोलगे March 21, 2026 04:13 PM

Sanjay Raut on Jagdeep Dhankhar: शिवसेना खासदार संजय राऊत यांना कथित पत्राचाळ प्रकरणामध्ये ईडीकडून अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर 100 आर्थर रोडमधील जेलमध्ये घालवली. यावेळी त्यांनी 'नरकातील स्वर्ग' पुस्तक लिहिलं होतं. आता या पुस्तकाची हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती सुद्धा येत असून सोमवारी (23 मार्च) या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. या नव्या पुस्तकांमध्ये चार प्रकरणे नव्याने जोडण्यात आली आहेत. यामध्ये माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा तडकाफडकी राजीनामा का घेण्यात आला? याबाबत खुलासा करण्यात आला आहे. 

ईडीचा धाक दाखवून राजीनामा, धक्कादायक खुलासा

जगदीप धनकड यांना सुद्धा ईडीचा धाक दाखवून राजीनामा घेण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा या पुस्तकामधून करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या कुटुंबाला सुद्धा ईडीचा धाक दाखवण्यात आल्याचा दावा या पुस्तकातून करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी इंग्रजी पुस्तकांमध्ये नव्याने चार प्रकरणे जोडले असून यामध्ये म्हटले आहे की जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी मोदी सरकार विरोधात कारवायांची माहिती मिळाली होती. याचा सुगावा लागताच सरकारकडून त्यांचा राजीनामा मागण्यात आला. मात्र, जगदीप धनखड यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे सरकारकडून जयपूरमध्ये त्यांनी घराचा व्यवहार केल्यानंतर त्यातील पैसा हा परदेशात पाठवला होता. याच प्रकरणावरून ईडीने फाईल तयार केली आणि हीच फाईल जगदीश धनखड यांच्यासमोर ठेवण्यात आली, असेही म्हटलं आहे. 

विशेष म्हणजे संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच जगदीश धनखड यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांचे पहिल्यांदाच राजीनाम्यानंतर थेट दर्शन झाले होते. दरम्यान, या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवारी होणार असून या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी उपस्थित राहणार होते, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार होते. मात्र दे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.