गोव्याचा प्लॅन फसणार नाही रंगणार; स्ट्रगलर सालानंतर 'मामाच्या गोव्याचा जाऊया' प्रेक्षकांच्या भेटीला, विजू माने म्हणाले..
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क March 21, 2026 04:13 PM

Viju Manes Mamachya Govyala Jauya Film: मराठी सिनेसृष्टीत सध्या चित्रपटातून नवे कंटेट प्रेक्षकांसमोर सादर केले जात आहे.  आजच्या तरुणाईला नेमके कोणते कंटेट आवडेल, यावर विशेष विचार केला जातो आहे. सध्या तरुणवर्गाला आवडतील, असे अनेक चित्रपट किंवा वेब सिरीज प्रेक्षकांसमोर सादर केले जात आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने, यांनी देखील 'स्ट्रगलर साला' या गाजलेल्या सिरीजमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता लवकरच विजू माने एक नवा प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांसमोर सज्ज होणार आहे. 'मामाच्या गोव्याला जाऊया', असे माने यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून,  लवकरच हा सिनेमा तरुणांच्या भेटीस येणार आहे. 

मराठी सिनेसृष्टीत सध्या नव्या, फ्रेश कंटेटची लाट पाहायला मिळत आहे.  याच पार्श्वभूमीवर लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते  विजू माने 'मामाच्या गोव्याला जाऊया'  ही फिल्म प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे.  विजू माने यांचा स्ट्रगलर साला या वेब सिरीजला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. आता 'मामाच्या गोव्याला जाऊया' या चित्रपटाद्वारे ते तरुणाईंचा अत्यंत जवळच्या विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला असून, या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 

'मामाच्या गोव्याला जाऊया' या चित्रपटातून आपल्याला मित्रांची धम्माल आणि नात्यांमधील मोकळीक यांचा भन्नाट मेळ यातून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. माहितीनुसार, फ्रेंडशिपच्या आठवड्यात हा सिनेमा रिलीज होणार असून, तरुणांमध्ये या चित्रपटाची विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.  या चित्रपटाची कथा नेमक्या कोणत्या विषयावर आधारीत आहे,  या चित्रपटात मुख्य भूमिकेत नेमकं कोणते कलाकार झळकणार? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.  

दरम्यान, चित्रपटाच्या शीर्षकावरून यात गोव्याची धम्माल दाखवण्यात येणार, एवढं मात्र नक्की.  या चित्रपटाविषयी विजू माने सांगतात, 'स्ट्रगल साला या सिरीजला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला.  याच भावनेतून मामाच्या गोव्याला जाऊया, ही कल्पना आकारली आहे. या चित्रपटातून आमचा प्रेक्षकांना मनसोक्त हसण्याचा,  मित्रांसोबत घालवलेल्या क्षणांची आठवण आणि  नॉस्टॅल्जिक अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे.  प्रत्येक फ्रेंड्स ग्रुपमध्ये गोव्याला जाण्याचा प्लॅन आखला जातो.  परंतु, काही प्लॅन्स फसतात.  अशीच ही मित्रांची कहाणी आहे. हलक्या फुलक्या शैलीत सादर केलेली कथा आपल्याला नक्कीच आवडेल', असं विजू माने म्हणाले. विजुमेनिया प्रायव्हेट लिमिटेड निर्मित, विजू माने लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणा आहे.  

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.