Maharashtra News Update : चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया
Sarkarnama March 21, 2026 04:45 PM
Rupali Chakankar : चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी ट्विट करून सांगितलं की, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला आहे. सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून मी त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहे.

Sanjay Raut on ashok kharat case केसरकर शिक्षणमंत्री असताना त्यांचं खातं भोंदूबाबा चालवायचा : संजय राऊत

अशोक खरात प्रकरणावरून ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिक्षणमंत्री असताना दीपक केसरकरांच्या खात्यात भोंदूबाबा हस्तक्षेप करत होता, असा जोरदार आरोप केला आहे. राऊत म्हणतात की या प्रकरणामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे आणि शिंदेंनी केसरकरांची हकालपट्टी करावी.

Sushma Andhare On Rupali Chakankar : रुपाली चाकणकर यांचे 'गिरे तो भी टांग उपर'; सुषमा अंधारे यांची जोरदार टीका

रुपाली चाकणकर यांच्या कथनी आणि करणीत फरक होता, असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला. 'एकीकडे जाहीर कार्यक्रमात 'मुलींच्या हातात पोथ्या-पुराणं नको, संविधान द्या' म्हणायचं आणि वास्तवात कोणाचेतरी पाय धुवायचे. रिल्ससाठी नवऱ्याने तुमची पूजा करायची आणि वास्तवात तुम्ही मात्र लिंगपासाटाची पूजा करायची. सुनील तटकरेंचा हात डोक्यावर आहे, तोपर्यंत आपल्या केसाला धक्का लागू शकत नाही. पण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. यानंतरी रुपाली चाकणकर यांचे 'गिरे तो भी टांग उपर',' अशाप्रकारचे वर्तन सुरु आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

Sushma Andhare On Rupali Chakankar : खरातबरोबर चाकणकर यांना 'मकोका' लावला पाहिजे; सुषमा अंधारे यांची मागणी

रुपाली चाकणकर यांच्यावर पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार हल्ला चढवला. 'आतातरी झोपेतून जागे व्हावे, शुद्धीव व्हावे. भविष्यात अजून अजून जमिनीवर येणार आहात. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही. त्यांना महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात सहआरोपी करुन अटक केली पाहिजे. रुपाली चाकणकर या अशोक खरातकडून चालवल्या जाणाऱ्या संघटित गुन्हेगारीचा भाग होत्या. त्यांच्यावर मकोका लागला पाहिजे,' अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

Gautam Singhania Accident News : रेमंडच्या गौतम सिंघानियांच्या स्पीड बोटीला अपघात; मालदीवमधून जखमी अवस्थेत मुंबईत हलविले

रेमंड समूहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया मालदीवमध्ये एका भीषण स्पीडबोट अपघातात जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी पहाटे 1:15च्या सुमारास मालदीवमधील 'व्ही फेलिधू' बेटाजवळ घडला. सिंघानिया यांना तातडीने रेस्क्यू करून उपचारांसाठी मुंबईत एअरलिफ्ट करण्यात आले आहे.

Terror Attack : मुंबईसह 7 राज्यांमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा कट; पोलिसांकडून ISI च्या 9 दहशतवाद्यांना अटक

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील पोलिसांनी सात राज्यांमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा कट उधळून लावला आहे. दहशतवादी टोळीच्या नऊ सदस्यांना अटक करण्यात आली असून, त्यात पाच अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आतापर्यंत या टोळीच्या 15 सदस्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या सहा हेरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे उर्वरित नऊ जणांना अटक करण्यात आली. ही टोळी भारतात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करत असल्याचं चौकशीदरम्यान उघड झालं.

Deepak Kesarkar On Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातवर माजी मंत्री दीपक केसरकर यांची पहिली प्रतिक्रिया...

एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी मंत्री दीपक केसरकर यांनी भोंदूबाबा अशोक खरातवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "माझा या घटनेशी काही संबंध नाही. खरात वैयक्तिक आयुष्यात काय करतो, याच्याही माझा काहीच संबंध नाही. ज्योतिषाकडे सर्वजण जातात. पण त्याने काय केलं आहे हे मला माहीत नाही. पण त्याने काही केलं असेल तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी माझा काही संबंध नाही."

Trump control of Hormuz Kharg Island : डोनाल्ड ट्रम्पना हवाय होर्मुझ, खार्ग बेटावर ताबा; अमेरिकेची तिसरी युद्धनौका

होर्मुज सामुद्रधुनी व तेलनिर्यातीचे महत्त्वाचे खार्ग बेट ताब्यात घेण्यास अमेरिकेची ‘यूएसएस त्रिपोली’ ही तिसरी युद्धनौका रवाना होत आहे. या नौकेवर 2200 प्रशिक्षित सैनिक आहेत. ‘यूएसएस बॉक्सर’ ही नौकाही तैनात होत आहे. या रणनीतीनुसार जगाच्या 20 टक्के तेलपुरवठा साखळीवर अमेरिकेला नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

Anjali Damania On Rupali Chakankar : रूपाली चाकणकर यांचा राजीनामा देताना पोझ; दमानिया यांनी सोडलं टीकास्त्र

रुपाली चाकणकर यांचा राजीनामा स्वीकारताना, जे दिसलं त्यावर अंजली दमानिया यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. सुनेत्रा पवारांचा चेहरा गंभीर होता. पण रुपाली चाकणकर या, तर जसं मॉडेलिंगसाठी उभं राहतात, तशी पोझ देतानाचा फोटो होता. आणि त्यानंतरचं त्यांचं बोलणं ऐकलं तर, त्यात कुठेही खेद, विनम्रता नव्हती , एक अहंकार होता. हे सगळं पाहून वाटतं की चाकणकरांना खरंच इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे, अशा शब्दांच दमानिया यांनी रुपाली चाकणकरांवर टीकास्त्र सोडलं.

Anjali Damania On Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातच्या संपर्कात असलेला उपजिल्हाधिकारी कोण? अंजली दमानिया यांची पोस्ट

मुंबईत कार्यरत असलेले एक उपजिल्हाधिकारी भोंदूबाबा अशोक खरातला आर्थिक रसद पुरवत असल्याचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले असून, यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे थेट प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचले आहेत. इतरांच्या भविष्याची कुंडली मांडणाऱ्या या भोंदूची स्वतःची काळी कुंडली आता नाशिक पोलिसांच्या हाती लागली आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी राज्य सरकारने तातडीने 'एसआयटी'ची स्थापना केली आहे.

Amol Mitkari On Ashok Kharat : अजितदादांच्या विमान अपघाताशी अशोक खरातचा संबंध असण्याची शक्यता?

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताशी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातचा संबंध असण्याची शक्यता असल्याचा अत्यंत खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. व्हीएसआर कंपनीच्या विमानासोबत या भोंदूबाबाचे संबंध दिसत असल्याचे सांगत संबंधित विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांन सोबतचा खरात याचा फोटोही व्हायरल झाला आहे.

Ashok Kharat Update : मराठवाड्यातील हक्काचे पाणी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या संस्थेला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी राखीव असलेले पाणी नाशिक जिल्ह्यातील दारणा प्रकल्पातून भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातला देण्यात आल्याची धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या शिफारशीवरून खरातच्या मिरगाव (ता. सिन्नर) इथल्या शिवनिका संस्थानाला दररोज 39 लाख लिटर पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयावर 31 जुलै 2020 रोजी मंत्रिमंडळ उपसमितीने शिक्कामोर्तब करून सरकारी आदेशही जारी केला होता.

सी. पी. राधाकृष्णन आज मुंबई दौऱ्यावर; सुनेत्रा पवारांची सांत्वन भेट

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आज मुंबई दौऱ्यावर आहेत.अजित पवार महायुती सरकारमध्ये असताना सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते ते आज संध्याकाळी देवगिरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर सांत्वन भेट घेणार आहेत.

अशोक खरात प्रकरणात शिवसेनेचे माजी मंत्री दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे SIT चौकशीच्या फेऱ्यात आखाती युद्धाचा परिणाम; बुलढाण्यात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. Ashok Kharat: नाशिकचा स्वयंघोषित कॅप्टन उर्फ अशोक खरातचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. अल्पवयीन मुलीवर अघोरी उपचार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘केबल टेस्टर’ आणि तांत्रिक उपकरणांचा वापर करून खरात उपचार करीत असल्याचे दिसते.
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.