Ashok kharat: मोठी खळबळ! अटकेपूर्वीच अशोक खरातसोबत सीक्रेट मीटिंग, ते 3 IAS अधिकारी कोण?
Tv9 Marathi March 21, 2026 04:45 PM

Ashok Kharat-IAS Officers Meeting: नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले. त्याचे व्हिडिओतील किळसवाणे प्रकार समोर आल्यानंतर समाजात संतापाची लाट उसळली आहे. मारण्याची धमकी देऊन त्याने महिलांचे लैंगिक शोषण केले. याचे 100 हून अधिक व्हिडिओ समोर आले आहेत. तर मोक्याच्या जमिनी दडपशाही, धमक्या देऊन त्याने बळकावल्या आहेत. अर्थातच हे प्रकार प्रशासकीय यंत्रणा, राजकीय दबाव आणि पोलिसांच्या मदतीशिवाय होऊ शकत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर एक खळबळजनक बाब समोर आली आहे. त्याच्या अटकेपूर्वीच 3 IAS अधिकाऱ्यांसोबत त्याची बैठक झाल्याची माहिती आता समोर आली आहे.

3 IAS अधिकारी आणि कॅप्टन खरात यांची बैठक

अटकेच्या तीन दिवस आधी राज्यातील 3 IAS अधिकारी आणि कॅप्टन खरात यांची बैठक झाली होती, ही खळबळजनक बाब तपासात समोर आली आहे. शिर्डीत तीन IAS अधिकारी कॅप्टन खरातला भेटले. शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये बैठक झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांना त्याला अटक करताना अत्यंत गोपनीयता का बाळगली. अटक करण्यासाठी जे पथक पाठवले, त्यातील काही अधिकाऱ्यांनाही खरातच्या अटकेची कल्पना देण्यात आली नव्हती. बंगल्यात चोर शिरल्याच्या निमित्ताने पोलीस रात्री त्याच्या घरात दाखल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी कॅप्टन खरात याला उचलले.

समझ रहे हो ना बिनोद

या सीक्रेट मीटिंगमागे एक विनोद नावाची व्यक्ती होती अशी माहिती समोर येत आहे. विनोद नामक व्यक्तीने या तीन IAS अधिकाऱ्यांची आणि खरातची बैठक घडवून आणल्याची माहिती आहे. पण ही बैठक नेमकी कशासाठी झाली. या बैठकीत काय चर्चा झाली. त्यात काय घाडमोड घडली. राज्यातील ते तीन IAS अधिकारी कोण? SIT चौकशीत समोर येणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. शिर्डी परिसरात आरोपी कॅप्टन खरातचा विनोद नामक पंटर आहे. हा विनोद चौकशीच्या फेऱ्यात येणार का? त्याने ही भेट का घडवून आणली आणि हा विनोद आता कुठं दडून बसला याचा तपास आता पोलीस करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.