समलैंगिक संबंधांना विरोध; 12 अन् 10 वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलाला क्रूरपणे संपवलं; चक्रवून टाकणारी पुण्यातील घटना
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे March 21, 2026 07:13 PM

पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी गावात १७ मार्चला १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलाची हत्या झाली होती. ही हत्या अक्षय दत्तात्रय मांजरे या २२ वर्षांच्या तरुणाने समलैंगिक संबंधना विरोध केल्याने केल्याचं पोलीस तपासात (Pune Crime News) उघड झालं आहे. मात्र या हत्येचा तपस करताना आरोपी अक्षय मांजरेने मागील वर्षी २१ जूनला अशाच प्रकारे समलैंगिक संबंधांना विरोध केल्याने ११ वर्षांच्या मुलाची देखील हत्या केली होती असं तपासात उघड झालं आहे. विशेष म्हणजे या दोन्ही हत्या केल्यानंतर आरोपी अक्षय मांजरे हा त्या ठिकाणी गर्दीचा भाग म्हणून उभा होता.(Pune Crime News)

मुलाने विरोध केल्याने अक्षय मांजरेने त्याचाही डोक्यात दगड...

२१ जून २०२५ ला त्याने समलैंगिक संबंधांना विरोध करणाऱ्या ११ वर्षाच्या मुलाचा डोक्यात दगड घालून खून केला. मात्र त्या हत्येचा तपास पोलिसांनी व्यवस्थित केला नाही असा ग्रामस्थांचा आरोप आहे. अक्षय मांजरेवर संशय असल्याने त्याची जुजबी चौकशी करून त्यावेळी त्याला सोडून देण्यात आलं. त्यानंतर १७ मार्च २०२६ ला त्याने पुन्हा १२ वर्षाच्या एका मुलावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याही मुलाने विरोध केल्याने अक्षय मांजरेने त्याचाही डोक्यात दगड घालून खून केला. या दोनही हत्या करून आपला त्या हत्येंशी कोणताही संबंध नाही हे दाखवण्यासाठी तो तपासासाठी पोलीस घटनास्थळी आल्यानंतर तिथे उपस्थित राहत होता. अखेर पोलिसांनी गावातील अनेकांची कसून चौकशी करायचं ठरवलं. त्यावेळी अक्षय मांजरेच्या सांगण्यामध्ये पोलिसांना विसंगती जाणवू लागली आणि या दोन हत्येचा उलगडा झाला असल्याचं समोर आलं आहे.(Pune Crime News)

सायंकाळी ६ वाजेपर्यंत घरी परतला नाही

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, शिरूर तालुक्यातील दहीवडी गावात घडलेल्या एका धक्कादायक हत्या प्रकरणाची माहिती दिली आहे. शिरूर तालुक्यातील दहीवडी गावात १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह उसाच्या शेतात, एका विहिरीजवळ आढळून आला. हा मुलगा आदल्या दिवशी सकाळी १०:३० - ११:०० च्या सुमारास घरातून बाहेर गेला होता, पण सायंकाळी ६ वाजेपर्यंत घरी परतला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी शोध घेतला असता त्याचा मृतदेह सापडला. मुलाच्या डोक्यात गंभीर जखम होती आणि शरीरावर इतर ठिकाणीही ओरखड्यांच्या (Abrasion marks) खुणा होत्या. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने BNS कलम १०३ (१) नुसार हत्येचा (Murder) गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रँचची पथके काल रात्रीपासूनच आरोपीच्या शोधात होती.पोलिसांनी या गुन्ह्यात एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अशाच पद्धतीने एका १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. सध्याच्या प्रकरणाचा आणि त्या जुन्या घटनेचा काही संबंध आहे का, याचाही पोलीस सखोल तपास करत आहेत.(Pune Crime News)

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.