Small Cap Company : R M Drip & Sprinklers Systems Ltd ने गुंतवणूकदारांसाठी आनंद वार्ता आणली आहे. कंपनी आपल्या शेअरहोल्डर्सला बोनस शेअरची भेट देणार आहे. कंपनी गुंतवणूकदारांना 5:7 या प्रमाणात बोनस शेअर देणार आहे. म्हणजे प्रत्येक 7 शेअर्सवर कंपनी 5 नवीन शेअर मोफत देईल
कंपनीने बोनस शेअरसाठी नवीन रेकॉर्ड डेटची घोषणा केली आहे. त्यानुसार 10 एप्रिल रोजी रेकॉर्ड डेट असेल. यापूर्वी ही तारीख 7 एप्रिल अशी होती. त्यात तीन दिवसांची भर घालण्यात आली आहे. या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांकडे या कंपनीचे शेअर असतील. त्यांना बोनस शेअरचे गिफ्ट मिळेल.
म्हणजे या कंपनीचे 10 एप्रिलपर्यंत तुमच्याकडे जितके शेअर असतील, त्याच्या 5:7 प्रमाणात बोनस शेअरचे गिफ्ट मिळेल. म्हणजे प्रत्येक 7 शेअर्सवर कंपनी 5 नवीन शेअर मोफत मिळतील. त्यादिवशी गुंतवणूकदारांच्या प्रोफाईलमध्ये या कंपनीचे शेअर वाढतील. पण दिसतील काही दिवसानंतर
बोनस शेअर 13 एप्रिल रोजी अलॉट होतील. तर डीमॅट खात्यात हे शेअर 27 एप्रिल, 2026 रोजीपर्यंत दिसतील. कंपनीने सप्टेंबर 2025 रोजी 1:10 या प्रमाणात स्टॉक स्पिल्टची घोषणा केली होती. त्यावेळी शेअरची किंमत 10 रुपयांहून घसरून एक रुपयांवर आली होती. बाजारात लिक्विडिटी वाढवण्यासाठी कंपनीने हे पाऊल टाकले होते.
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.