सासवड, ता. २२ : सुपे खुर्द (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाईकवस्तीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे मुख्याध्यापक आबासाहेब खवले यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी भारुड, शेतकरी गीते, लावणी, कोळी गीते, वाघ्या-मुरळी आणि देशभक्तिपर गीतांवर सादरीकरण केले. कार्यक्रमाची सुरुवात सरपंच सुरेखा जगताप, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सीमा चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुभाष शिवतारे, संतोष जाधव, दीपाली चव्हाण, केंद्रप्रमुख धनाजी नाझीरकर, माजी विस्तार अधिकारी अनिल जगदाळे उपस्थित होते. चंद्रकांत घारमळकर यांनी सूत्रसंचालन केले, तर आबासाहेब खवले यांनी आभार मानले.
12801