संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
स्वानंद पाटील March 22, 2026 11:45 PM

Beed Crime News : बीड (Beed) जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. दोन वेळा दुकानात बोलावून अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परळी ग्रामीण पोलीस (Beed) ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नराधमाने अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीसोबत एका 50 वर्षीय नराधमाने दोनवेळा अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी ही 10 वर्षांची असून ती 5 वी वर्गात शिक्षण घेते. गावातील एका किराणा दुकानदाराने त्याच्या दुकानात बोलावून घेत तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. इतकच नाही तर अशाच प्रकार दोन महिन्यापूर्वी देखील करण्यात आला आणि त्या नंतर त्या नराधमाने अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. याच कारणामुळे या नराधमाने पुन्हा दोन महिन्यानंतर पीडितेवर अत्याचार केला आहे. यानंतर परळी येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी बालाजी पांचाळ याच्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांनी नराधमाला ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

नांदेड जिल्ह्यात लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

नांदेड जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका 46 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने दिली आहे. भाग्यनगर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून 39 वर्षीय इसमाला अटक केली आहे. मठातील 39 वर्षीय महाराज आणि 46 वर्षीय पीडित महिला यांचे एकमेकांवर प्रेम होते. या प्रेम संबंधातून त्यांची जवळीक वाढली. पण पुढे महाराजाने लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याची पीडित महिलेला जाणीव झाली आणि तिने तक्रार देत गुन्हा नोंदवला. पुढील तपास भाग्यनगर पोलिस करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.