जिंतूर-चारठाणा रोडवर भीषण अपघात
कार-ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक
चौघांचा जागीच मृत्यू
विशाल शिंदे, साम प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील जिंतूर-चारठाणा रोडवर एक भीषण अपघात झाला आहा. कार आणि ट्रॅव्हल्स यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण वसमत येथील रहिवासी असून ईदच्या निमित्ताने मंठा येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होते.
अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. तर कारमधील प्रवाशांचा चेंदामेंदा झाला आहे. या दुर्घटनेत सय्यद स्माईल (वय 32), सय्यद उपाध सय्यद (वय 7), सय्यद सुमय्या अझर अली (वय 32) आणि अझर महमूद (वय 38) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्वजण वसमत येथून मंठा येथे ईद सणासाठी निघाले होते. तर ट्रॅव्हल्स मधील 4 ते 5 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे.