पद्मश्री पोपटराव पवार यांच्याकडून भोंदूबाबा खरातचं कौतुक, धक्कादायक विधानाची राज्यभरात चर्चा!
admin March 23, 2026 12:25 AM
[ad_1]
पद्मश्री पोपटराव पवार यांच्याकडून भोंदूबाबा खरातचं कौतुक, धक्कादायक विधानाची राज्यभरात चर्चा!

नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरातवर लैंगिक अत्याचाराचे अनेक गुन्हे दाखल झाले आहे. सध्या अशोक खरात तपास यंत्रणांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. आगामी काळात इतरही महिला समोर येऊन खरातची पोलखोल करण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर खरातच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती असल्याचीही माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे. संपूर्ण राज्यात खरातविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी मात्र खरातचं कौतुक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भोंदूबाबा अशोक खरातला पोपटराव पवार यांचा पाठिंबा

भोंदूबाबा कॅप्टन खरात याला बलात्कार केल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर त्याचे आता नवनवीन व्हिडिओ समोर येत आहेत. त्याचे अनेक राजकीय तसेच प्रशासकीय संबंध पुढे आल्यानंतर सामाजिक क्षेत्रातील ही अनेक व्यक्ती त्याच्याकडे नियमित ऊठबस करत असल्याचे समोर आले आहे. अशातच हिवरे बाजार गावचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांचा कॅप्टन खरात बरोबरचा व्हिडिओ समोर आला आहे. 2011 पासून कॅप्टन खरात यांच्याशी संबंध आल्याचे पोपटराव पवार म्हणाले. हिवरे बाजारातील अनेक मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने खरात हिवरेबाजार मध्ये तीन दिवस मुक्कामास होता. गावात पाणी येण्यासाठी सांगितले होते उपाय गावच्या देवीची पूजा केल्यानंतर गावाला फरक पडला होता असे केले वक्तव्य.

अशोक खरात याच्या ओशनोलॉजीला शास्त्रीय आधार – पवार

भोंदू बाबा अशोक खरात याच्या ओशनोलॉजीला शास्त्रीय आधार असल्याचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी म्हटलं आहे. सिंगापूर आणि जपान सारख्या देशांमध्ये चोरांना पकडण्यासाठी पोलिसांकडून ओशनोलॉजीचा वापर केला जात असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, अशोक खरात याला पोलिसांनी अटक केल्यानंतर आता सध्या खरात चे कुटुंबीय हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्याकडे आश्रयास आहेत. खरात याला लागणारी कायदेशीर मदत आणि आर्थिक रसद पुरवण्यात पोपटराव पवार देखील सहभागी असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता पोपटराव पवार यांच्यावरही टीका होण्याची शक्यता आहे.

 


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.