Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची बसला धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
Saam TV March 23, 2026 01:46 PM
Summary -
  • पुणे-नाशिक महामार्गावर मंचरजवळ भीषण अपघात

  • भरधाव कारने बसला पाठीमागून दिली जोरदार धडक

  • एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू

  • अपघातामध्ये २ लहान मुलं गंभीर जखमी

  • पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू

रोहिदास गाडगे, पुणे

पुण्यातील मंचरजवळ भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव कारने प्रवासी बसला धडक दिली. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झालरा तर दोघे जण गंभीर जकमी झाले आहेत. पुणे–नाशिक महामार्गावर मंचरजवळील एकलहरे येथे ही अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंचर पोलिस या अपघाताच तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर मध्यरात्री हा अपघात झाला. मंचरजवळील एकलहरे गावाजवळ भरधाव कारने लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन मुलं गंभीर जखमी झाले. कारमधून प्रवास करणारे सर्वजण एकाच कुटुंबातील होते. या अपघातामध्ये कारचा चुराडा झाला.

Accident : देवदर्शनाहून येताना काळाचा घाला, बाप-मुलगा अन् सुनेसह ५ जणांचा मृत्यू

या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील आई, वडील आणि आजी अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन लहान मुलं गंभीर जखमी झाली आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत्यू झालेल्या तिघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केले. तर दोन्ही जखमींवर सध्या मंचर येथे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Accident News : उड्डाण घेताच हेलिकॉप्टर समुद्रात कोसळलं, दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू

अपघातामुळे पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला घेत वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला. पोलिस या अपघात प्रकरणाचा तपास करत आहेत. या अपघातामध्ये आई-वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे मुलं पोरकी झाली. दरम्यान, एकलहरे परिसरात वारंवार अपघात होत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

Parbhani Accident: जिंतूर-चारठाणा रोडवर कार-ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक; भीषण अपघातात कारचा चक्काचूर, चौघांचा जागीच मृत्यू
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.