Maharashtra Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह ९ नेत्यांची जाणार आमदारकी, काय आहे कारण?
Saam TV March 23, 2026 02:46 PM
  • उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपणार

  • एकूण ९ नेते निवृत्त होणार

  • ही कारवाई नसून नियमानुसार प्रक्रिया

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्चला संपणार आहे. विधीमंडळाचे शेवटचे तीनच दिवस शिल्लक असल्याने विधिमंडळात एकीकडे आमदारांची कामकाजाची लगबग सुरू आहे. त्यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९आमदारकी जाणार असल्याची माहिती समोर आली.

ठाकरेंची आमदारकीचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपणार असल्याने हे सदस्य विधानपरिषदेतून निवृत्त होणार आहेत. उद्धव ठाकरेंसह ९ नेत्यांची आमदारकी का जाणार आहे, त्यांच्यावर कारवाई होणार आहे का? हे जाणून घेऊ.

Ashok Kharat: अजितदादांच्या घर अन् कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली; अमोल मिटकरींचा दावा विधान परिषदेतील सदस्यता

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 आमदारांची मुदत 13 मे 2026 रोजी संपणार आहे. हे सदस्य विधान परिषदेतून निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या 9 आमदारांचा कार्यकाळ लवकरच समाप्त होत आहे. हे त्यांचे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. मे महिन्यात त्यांचा कालवधी संपणार असल्याने पुढच्या महिन्यात या रिक्त जागेसाठी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराला पोलिसांची नोटिस; राजकीय वर्तुळात खळबळ

दरम्यान विधानपरिषदेतून रिक्त होत असलेल्या जागेसाठी विधानसभेतील आमदारातून निवडून द्यावयाच्या आहेत. त्यामुळे येत्या काळात या नऊ जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच पाहावयाला मिळेल.

कोण-कोणत्या पक्षातील नेत्यांची सदस्यता जाणार?

सोमवारी विधानपरिषदेत उद्धव ठाकरे यांच्यासह कार्यकाळ संपत असलेल्या नऊ आमदारांना निरोप देण्यात येणार आहे. यात भाजपचे 4, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा 1, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 1, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा 1, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 तर काँग्रेसचा 1 सदस्य निवृत्त होणार आहेत.

या नेत्यांची आमदारकी जाणार

उद्धव ठाकरे,

डॉ. नीलम गोऱ्हे

अमोल मिटकरी

शशिकांत शिंदे

राजेश राठोड

रणजितसिंह मोहिते पाटील

संदीप जोशी

दादाराव केचे

संजय केनेकर हे सदस्य निवृत्त होत आहेत

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.