Shambhuraj Desai : साताऱ्याचा वाद पेटला, मंत्री शंभूराज देसाईंना मारहाण, मुख्यमंत्री का संतापले? विधान भवनात काय घडतय?
Tv9 Marathi March 23, 2026 03:45 PM

सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रकरणात मंत्री शुभंराज देसाई यांना झालेल्या मारहाणीचे आज विधासभेत पडसाद उमटले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विधानभवनाच्या पाऱ्यावर आंदोलन केलं. पायऱ्यांवरील आंदोलनावरुन मुख्यमंत्री संतापल्याचं दिसत आहे. सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शंभुराज देसाई यांच्यात चर्चा झाली. मुख्यमंत्री चिडल्याचे देहबोलीवरून दिसत आहे. मागील बाकावर राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटीलही आहेत.”उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितली आहे, या प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल. त्यानुसार कार्यवाही केली जाईल” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“खोतकर व देसाईयांनी जी परिस्थिती मांडली. त्याचा मी देखील साक्षीदार आहे. ही निवडणूक प्रक्रिया सुरु झाली तेव्हा शंभूराज देसाई यांनी सांगितले. दोन मतदारांवर जुना गुन्हा एक दिवस आधी दाखल केला. त्यांना अटक करणार असल्याचे सांगितले. मी पोलीस अधिक्षकांना कॉल केला. नंतर अटक करून असं ते म्हणाले. मी हा सांगितले, मतदानापासून त्यांना वंचित ठेवता येणार नाही. एसपी म्हणाले असे होणार नाही. मी पोलीस महासंचालक यांच्यासोबत बोललो. डीजी म्हणाले मी कॉल केला आहे व मतदानापासून वंचित ठेवणार नाही” अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

तसे मला व सदस्याला फरफटत नेले

“खोतकर यांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला ही वस्तुस्थिती आहे. मी पक्षाचा प्रतोद व उपनेता आहे. त्या निवडणुकीत व्हीप बजावण्याचा अधिकार मला दिला आहे. चौथ्या मजल्यावर हे मतदान होते. दोन सदस्य, मी व मंत्री आबा पाटील होते. 100 पोलीस त्याठिकाणी होते. 100 पोलिसांनी मला अडवले. तो सदस्य सांगत होता, माझ्यासोबत पालकमंत्री आहेत. त्यांना दरवाजापर्यंत येऊ द्या. दंडाला चार ते पाच पोलीस आरोपीला फरफटत नेतात, तसे मला व सदस्याला फरफटत नेले” असा दावा शंभूराजे देसाई यांनी केला.

ही लोकशाही आहे का?

“यासंदर्भात मी चार दिवस गोळ्या खात आहे. मुका मार लागला आहे. माझे आजोबा राज्याचे गृहमंत्री होते. अध्यक्षांच्या आसनावर ते बसले होते. ही लोकशाही आहे का?” असा सवाल शंभूराजे देसाई यांनी केला.

या सभागृहात त्यांना बडतर्फ करावे

“समोरच्या बाजुला एका विशिष्ट पक्षाचे 10 ते 15 पदाधिकारी होते. जे आमदार, खासदार किंवा मंत्री नाहीत. मला लागले. मी डायबेटिस पेशंट आहे. रक्त वाहत होते. बॉडीगार्ड यांनी औषध दिले. आमचे सदस्य त्यांना कमी करायचे होते. या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक, देवकर व गर्जे यांना मी ओळखले आहे. विधानपरिषदेत त्यांना निलंबित केले आहे. या सभागृहात त्यांना बडतर्फ करावे” अशी मागणी शंभूराजे देसाई यांनी केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.