इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय दुष्परिणाम? पंतप्रधान मोदींनी शांतपणे सगळं उलगडून सांगितलं, भारताकडे तेलाचा किती साठा शिल्लक?
सोमेश कोलगे March 23, 2026 05:43 PM

PM Modi on Iran War: पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीवर लोकसभेत 25 मिनिटे माहिती दिली.तणाव संपलाच पाहिजे आणि या समस्येवर संवाद हाच एकमेव उपाय असल्याचे मोदी म्हणाले.पंतप्रधानांनी सांगितले की, नागरिक आणि वीज प्रकल्पांवरील हल्ले अस्वीकार्य आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी रोखणे स्वीकारार्ह असणार नाही. पंतप्रधान म्हणाले, "सरकार देशात तेल आणि वायूचे संकट टाळण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी, आम्ही आता 27 देशांऐवजी 41 देशांकडून आयात करत आहोत. पश्चिम आशियामध्ये एक कोटी भारतीय राहतात. त्यांची सुरक्षा हे आमचे प्राधान्य आहे." त्यांनी सांगितले की, 3 लाख 75 हजार भारतीय सुखरूप देशात परतले आहेत. एक हजार भारतीय एकट्या इराणमधून सुखरूप परतले आहेत. त्यापैकी 700 हून अधिक तरुण वैद्यकीय विद्यार्थी आहेत. राजनैतिक संबंधांमध्ये भारताची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आम्ही तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मी पश्चिम आशियातील नेत्यांशी बोललो आहे. मी सर्वांना तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे. व्यापारी जहाजांवरील हल्ले आणि अडथळा आणणे अस्वीकार्य आहे. भारत सर्व पक्षांना शक्य तितक्या लवकर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

पीएम मोदीच्या भाषणातील 6 महत्त्वाचे मुद्दे

तेल आणि वायू संकट

आज, आम्ही 6.5 दशलक्ष मेट्रिक टन साठ्याची व्यवस्था करण्यावर काम करत आहोत. सरकार विविध देशांतील पुरवठादारांच्या संपर्कात आहे. जिथून शक्य असेल तिथून पुरवठा सुरू राहील, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तेल, वायू आणि खते घेऊन जाणारी जहाजे भारतात सुरक्षितपणे पोहोचावीत, यासाठी आम्ही मित्र राष्ट्रांशी संवाद साधत आहोत.

अन्न आणि शिधावाटप

आमच्याकडे पुरेसा अन्नसाठा आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आमच्याकडे पुरेशी व्यवस्था आहे. त्या वेळीसुद्धा जागतिक पुरवठा साखळीत तुटवडा होता. भारतीय शेतकऱ्यांना 300 रुपयांपेक्षा कमी किमतीत युरियाची एक गोणी पुरवण्यात आली.

वीजपुरवठा

युद्धापुढील एक आव्हान म्हणजे देशात उन्हाळा सुरू होत आहे. येत्या काळात विजेची मागणी वाढेल. देशातील वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा उपलब्ध आहे. वीज निर्मितीपासून ते पुरवठ्यापर्यंतच्या प्रत्येक यंत्रणेवर देखरेख ठेवली जात आहे.

ऊर्जा क्षेत्र

आम्हाला माहित आहे की आज ऊर्जा हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पश्चिम आशिया हा जागतिक गरजा पूर्ण करणारा स्रोत आहे. या युद्धाचे भारतावरील प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी आम्ही एका रणनीतीवर काम करत आहोत. भारत सरकारने एक गट स्थापन केला आहे, जो दररोज बैठक घेऊन आयात आणि निर्यातीमध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांवर सातत्याने काम करतो. 

भारतीयांची सुरक्षा

या संकटाच्या काळात भारतीयांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे. सध्या, 3 लाख 75000 भारतीय सुखरूप देशात परतले आहेत. एकट्या इराणमधून हजारो जण सुखरूप परतले आहेत. त्यापैकी 700 हून अधिक जण वैद्यकीय विद्यार्थी आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.