काहीही झाले तर आता सोडणार नाही, इराणची थेट धमकी, वीज, पाणी आणि अन्नाचे संकट, आखाती देश…
GH News March 23, 2026 04:17 PM

28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्त्रायलने मोठा हल्ला इराणवर केला. तिथेच युद्धाला सुरूवात झाली. ज्या ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, अशा ठिकाणी मोठा हल्ला इराणकडून करण्यात आला. अमेरिका आणि इराणच्या युद्धात आखाती देश भरडले गेले आहेत. आता तर या युद्धादरम्यान या देशांवर मोठं संकट आहे. अमेरिकेने होर्मुज मार्ग खुला करण्याकरिता 48 तासाचा वेळ दिला होता. मात्र, स्थिती जैसे थे आहे. अमेरिकेने अगोदरच सांगितले की, जर इराणकडून होर्मुज मार्ग खुला करण्यात आला नाही तर आम्ही ऊर्जेवर हल्ला करू. यानंतर इराणकडूनही सांगितले गेले की, तुम्ही फक्त ऊर्जा प्रकल्पांवर हल्लाच करा बघा आम्ही पूर्ण आखाती देशात असलेल्या अमेरिकेसंबंधित कंपन्यांवर हल्ला करू. अमेरिकेच्या धमकीनंतर आता आखाती देशांमध्ये पाणी, विज आणि अन्नाचीही मोठी समस्या उभी होऊ शकते. त्यापूर्वीच आता इराणकडून मोठे भाष्य करण्यात आले.

इराणकडून जारी करण्यात आलेल्या त्यांच्या निवेदनात म्हटले की, आम्ही अगोदरच जाहीर केले आहे की, आमच्या वीज प्रकल्पांवर हल्ला केला तर आम्ही कब्जा करणाऱ्या राजवटीच्या आणि अमेरिकी तळांना वीजपुरवठा करणाऱ्या सर्व प्रादेशिक देशांमधील वीज प्रकल्पांवर आणि यासोबतच अमेरिकेसोबत हितसंबंध आहेत, अशा सर्व औद्योगिक आणि आर्थिक ऊर्जांचा पायाभूत सुविधांवर हल्ला करू.

आमची इच्छा आहे की, हे सर्व करण्याची वेळच आमच्यावर येणार नाही, पण जर आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही सोडणार पण नाहीत. पुढे इराणने म्हटले की, आमच्या रूग्णालयावर हल्ला करण्यात आला, आमच्या शाळांवर हल्ला करण्यात आला, आमच्या आराम केंद्रांवर हल्ला करण्यात आला, पण आम्ही असे काहीच केले नाही. हा पण आता त्यांनी आमच्या ऊर्जेवर हल्ला केला तर आम्ही 100 टक्के त्यांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार आहोत.

आखाती देशांमधील संकट वाढत असून, त्यामुळे पाणी आणि ऊर्जा पुरवठ्याला धोका निर्माण झाला आहे. काही तासांत हे युद्ध अधिक धोकादायक पातळीवर पोहोचू शकते. या वाढत्या संघर्षाचा परिणाम फक्त प्रादेशिक सुरक्षेपुरता मर्यादित नाही. पुढील काही तासात युद्ध अधिक भयंकर स्थिती पोहोचण्याचे मोठे संकेत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.