असमतोल रस्त्याने हाडे खिळखिळी
esakal March 23, 2026 08:45 PM

असमतोल रस्त्याने हाडे खिळखिळी
बोईसरमधील बाह्यवळण रस्त्यावरील प्रकार

बोईसर, ता. २३ (वार्ताहर) : येथील सिडकोच्या बाह्यवळण रस्त्यावरील अपूर्ण रस्त्यामुळे तीव्र चढ-उतार निर्माण झाला आहे. या मार्गावरून वाहन चालवणे कठीण झाले असून वाहनचालकांची हाडे खिळखिळी झाली आहेत.
या मार्गाचे १२७ मीटर क्राँक्रीटीकरणापैकी ८५ मीटर काम पूर्ण झाले असून उर्वरित ४२ मीटरचा काही भाग अतिक्रमणामुळे रखडला आहे. या मार्गावरून रुग्णवाहिकांसह इतर वाहनांची सातत्याने वर्दळ आहे; पण रस्ता असमतोल असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.