एकूण 3 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी 19 व्या मोसमात अजिंक्य रहाणे याच्याकडे आहे. केकेआर सध्या जोरदार सराव करत आहे. रहाणेला नेतृत्वाचा तगडा अनुभव आहे. मात्र रहाणेवर वेगवान बॅटिंगबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. रहाणेने त्याच्या या क्षमतेवर शंका घेणाऱ्यांना बॅटिंगनेच उत्तर दिलं आहे. रहाणेने सराव सामन्यादरम्यान चौकार षटकार ठोकून आपण मुख्य स्पर्धेसाठी सज्ज असल्याचं जाहीर केलं आहे.