तिहार तुरुंगात शिक्षा भोगून आलेल्या राजपाल यादवचा खुद्द विराट कोहलीही फॅन; वारंवार पाहतो 'हा' सिनेमा
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क March 24, 2026 09:43 AM

Rajpal Yadav Dhol Is Virat Kohli Favourite Movie: चेक बाऊन्स प्रकरणापासून (Cheque Bounce Case) बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) सतत चर्चेत आहे. सध्या अभिनेत्याला जामीन मंजूर (Actor Granted Bail) झाला असून तो वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये दिसून येतोय. फेब्रुवारी महिन्यात, एका जुन्या 'चेक बाऊन्स' प्रकरणामुळे या अभिनेत्याला तुरुंगवास भोगावा लागलेला. 5 फेब्रुवारी रोजी राजपाल यादवनं तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं आणि त्यानंतर संपूर्ण बॉलिवूड अभिनेत्याच्या मदतीसाठी पुढे आलं. अनेकांनी त्याला आपला पाठिंबा दर्शवला. फक्त सहकलाकारच नाहीतर चाहत्यांनीही राजपाल यादवला आपला पाठिंबा असल्याचं सांगितलेलं. अखेर सध्या अभिनेता जामीनावर बाहेर असून आपल्या कामांमध्ये व्यस्त आहे. 

राजपाल यादवनं 1999 मध्ये 'शूल' या सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं, ज्यामध्ये त्यांनी एक छोटीशी भूमिका साकारली होती. त्या चित्रपटात त्यांनी नकारात्मक पात्र साकारलं होतं. पण  2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जंगल' या सिनेमानं त्यांना व्यापक ओळख मिळवून दिली. आपल्या अचूक 'कॉमिक टायमिंग'च्या जोरावर, राजपाल यादवनं हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेक अविस्मरणीय चित्रपटांमध्ये काम केलंय. पण तुम्हाला माहितीय का? टीम इंडियाची (Team India) 'रन मशीन' असलेला विराट कोहलीसुद्धा (Virat Kohli) राजपाल यादवचा फॅन आहे. राजपाल यादवचा एक सिनेमा आहे, जो विराट कोहलीला खूप आवडतो.

राजपाल यादवचा कोणता सिनेमा विराट कोहलीचा फेवरेट? (Which Rajpal Yadav Movies Is Virat Kohli Favorite?)

राजपाल यादवनं 'भूल भुलैया', 'चुप चुप के', 'मालामाल वीकली'सह अनेक फिल्ममध्ये काम केलंय. या फिल्ममधल्या आपल्या भूमिकांनी अभिनेत्यानं आपली छाप सर्वांवर सोडली. त्याचे कॉमिक टायमिंग आणि एक्सप्रेशन्स असे असतात की, कोणालाही हसू आवरत नाही. राजपाल यादवच्या अशाच एका फिल्मचा उल्लेख खुद्द विराट कोहलीनंही केलेला. विराटनं सांगितलेलं की, राजपाल यादवचा एक सिनेमा त्याला खूप आवडतो, जो पाहताना हसून हसून त्याच्या पोटात चक्क दुखू लागतं. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला राजपाल यादवचा 'ढोल' (Dhol) हा सिनेमा प्रचंड आवडला. विशेषतः त्यातील 'पानवाला' सीन, ते पाहून तो हसून लोटपोट होतो.

विराट कोहलीनं केलेली फिल्मचं कौतुक (Virat Kohli Praises Dhol Film)

विराट कोहलीनं एका मुलाखतीत बोलताना सांगितलेलं की, 'ढोल' त्याचा आवडता सिनेमा आहे. त्यांनी सांगितलं की, चर्चेदरम्यान आपल्या फेवरेट सिनेमाचा उल्लेख करताना म्हटलेलं की, "ती फिल्म पाहिलीय तुम्ही ढोल? त्यातला एक डायलॉग आहे, ते प्लान बनवत असतात, आपलं कसलंतरी दुकान सुरू करणार असतात. त्यावेळी कुणाल खेमू म्हणतो की, "'कोई ऐसा नाम बता, जो मुंह से फटाक से निकले..." त्यावेळी राजपाल यादव म्हणतो की, "थूक..." ही अशी फिल्म आहे, जी मी कधीही पाहिली तर, मला हसूच आवरत नाही. 

2007 मध्ये रिलीज झालेली 'ढोल' (Dhol Film Released In 2007)

प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेला 'ढोल' हा सिनेमा 2007 मध्ये प्रदर्शित झालेला. यामध्ये राजपाल यादवसह शर्मन जोशी, तुषार कपूर आणि कुणाल खेमू यांसारख्या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. 14 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 33.27 कोटी रुपयांची कमाई केली आणि तो यशस्वी ठरला. आजही, जेव्हा जेव्हा हा सिनेमा टेलिव्हिजनवर दाखवला जातो, तेव्हा प्रेक्षक तो मोठ्या आवडीनं पाहतात. ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म्सचा विचार करता, हा सिनेमा 'प्राईम व्हिडिओ'वर (Prime Video) उपलब्ध आहे आणि IMDb वर त्याला 10 पैकी 6.6 इतकं रेटिंग मिळालं आहे.

Anil Kapoor Dawood Ibrahim Dhurandhar 2: दाऊदशी जवळीक असल्यानं अनिल कपूरनं 'धुरंधर 2' ची ऑफर नाकारल्याची चर्चा; अखेर स्वत: सांगितलं कारण...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.