पुणे ः राज्य वकील परिषदेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २४) मतदान होणार आहे. पुण्यातील सुमारे १५ हजार वकील मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सकाळी नऊ ते सायंकाळी पाचदरम्यान मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र, गोवा, दादर व नगर हवेली आणि दमण दीव येथील मिळून १५५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यापैकी २५ उमेदवार पुणे जिल्ह्यातील आहेत. मागील वेळी परिषदेच्या कार्यक्षेत्रातून २५ जण निवडून आले होते.
Latest Marathi News Update : मध्य रेल्वे मध्ये घेण्यात घेणार विशेष मेगा ब्लॉकमात्र, यंदा पहिल्यांदाच महिलांना आरक्षण दिले आहे. २३ जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये १८ जण सर्वसाधारण गटातून विजयी होणार आहेत, तर पाच महिला राखीव गटातून उमेदवार विजयी होणार आहेत. निवडणुकीनंतर दोन महिलांची निवड स्वीकृत पद्धतीने होणार आहे.
परिषदेसाठी राज्यातून एकूण एक लाख ९० हजार ते एक लाख ९५ हजार वकील मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातून २४ ते २५ हजार मतदार आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी न्यायालयातील मनुष्यबळ असेल की खासगी, बूथ प्रतिनिधीची निवड यासह विविध मुद्दे सोमवारी संध्याकाळपर्यंत निकाली निघाले नव्हते.
त्यामुळे निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवारांमध्ये नाराजी होती. याबाबत उमेदवार वकील आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्यात झालेल्या बैठकीनंतर यावर तोडगा काढण्यात आला.