Rajinikanth On Dhurandhar 2: आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित 'धुरंधर 2' (Dhurandhar 2) सिनेमा गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घालतोय. या सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अल्लू अर्जुन (Allu Arjun), महेश बाबू (Mahesh Babu), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि विजय देवराकोंडा (Vijay Deverakonda) यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर या सिनेमाचं उघडपणे कौतुक केलं आहे. अशातच आता सिनेसृष्टीचे थलायवा रजनिकांत (Rajinikanth) यांनीही आता 'धुरंधर 2'वर स्तुतिसुमनं उधळली आहेत. त्यासोबतच हा सिनेमा 'मस्ट वॉच' असल्याचंही सांगितलं. याशिवाय त्यांनी प्रत्येक भारतीयानं हा सिनेमा पाहावा अशी शिफारसही केली आहे.
23 मार्च रोजी, रजनीकांत यांनी त्यांच्या ट्विटरवर लिहिलंय की, "काय जबरदस्त फिल्म आहे... #Dhurandhar2!!! आदित्य धर बॉक्स ऑफिसचा बाप!!! रणवीर आणि पूरी कास्ट आणि क्रू ला खूप खूप शुभेच्छा... प्रत्येक भारतीयाने नक्कीच पाहण्यासारखा सिनेमा... जय हिंद..."
What a film … #Dhurandhar2 !!! Aditya Dhar 🫡 box office -ka baap !!! Many congratulations to Ranveer and the entire cast and crew. A must watch film for every indian. Jai hind 🇮🇳 @AdityaDharFilms @RanveerOfficial
— Rajinikanth (@rajinikanth) March 23, 2026
रजनीकांत यांच्या ट्वीटनंतर आता सिनेमाबद्दलती चर्चा आणि उत्सुकता पुन्हा एकदा शिगेला पोहोचल्याचं दिसून येतंय. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य धर यांनी लिहिलंय की, या रिव्यूनंतर, सिनेमाबद्दलची चर्चा आणि उत्सुकता पुन्हा एकदा शिगेला पोहोचल्याचं दिसून येतंय. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य धरनं लिहिलंय की, "सर, आम्ही सर्वजण मनोरंजनाचं मोजमाप केवळ एकाच निकषावर करत मोठे झालो आहोत, आणि तो निकष म्हणजे तुम्हीच... अनेक दशकं आम्हाला शिट्ट्या वाजवायला, हसायला, रडायला आणि जीवनातील भव्यतेचा अनुभव घ्यायला लावल्यानंतर, आजही त्याच शैलीनं आणि कौशल्यानं हे सर्व करणं, ही खरोखरच एक जादू आहे. म्हणूनच, जेव्हा तुम्ही 'धुरंधर 2' ला 'मस्ट वॉच' सिनेमा म्हणता, तेव्हा तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा 'सुपरस्टार' क्षण असल्याचं मला वाटतं. ज्या व्यक्तीनं आम्हाला सर्वांना मोठी स्वप्न पाहायला शिकवलं, त्याच व्यक्तीचा हा आशीर्वाद असल्याचं मला जाणवतं. सर, मी तुमचा किती ऋणी आहे, हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. या गोष्टीनं माझ्या हृदयाला खरोखरंच स्पर्श केलाय... जय हिंद..."

19 मार्च रोजी, सिने निर्मात्यांनी मुंबईत या सिनेमासाठी एक विशेष स्क्रीनिंग आयोजित केली होती. ज्याला सिनेमातील कलाकार आणि क्रू उपस्थित होती. प्रदर्शनानंतर, आदित्यनं सर्वांचे आभार मानले आणि सिनेमाच्या यशाविषयी आपले विचार मांडले. आदित्य म्हणाला की, "ज्यांनी ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्या सर्वांचे मी आभार मानतो, ज्योति देशपांडे यांच्यापासून ते, अर्थातच, माझे विभागप्रमुख (HODs), सहकारी कलाकार, अभिनेते आणि ज्या प्रत्येक व्यक्तीनं या सिनेमासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलंय, त्या प्रत्येकाचे..." अभिनेता पुढे बोलताना म्हणाला की, "आम्हाला मिळणाऱ्या सर्व प्रतिक्रिया पाहून, आणि अगदी त्या 'मीम्स' पाहूनही! मला खूप आनंद झाला आहे; पण ज्यांनी इथे येऊन आम्हाला पाठिंबा दिला आणि या प्रवासाचा एक भाग बनले, त्या सर्वांप्रती मला मनापासून कृतज्ञता व्यक्त करायचीय. तुमच्याशिवाय यातील काहीच शक्य झालं नसतं. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार..."
'धुरंधर : द रिवेंज'नं जगभरात एकूण 751.97 कोटींची जबरदस्त कमाई केली आहे, ज्यामध्ये 541.97 कोटी भारतातून आणि 210 कोटींची कमाई विदेशातून केली आहे. फिल्मचं भारतातलं नेट कलेक्शन 457.12 कोटी आहे.