Tuberculosis symptoms and prevention: नवी मुंबई : क्षयरोग (टीबी) (Tuberculosis Lungs) हा अजूनही भारतातील मोठा संसर्गजन्य आजार असून त्याचा लोकांच्या आरोग्यावर मोठा (Health Update) परिणाम होतो आहे. योग्य वेळी तपासणी, पूर्ण उपचार आणि साधे प्रतिबंधात्मक उपाय केल्यास हा आजार नियंत्रणात आणता येऊ शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे वेळीस याची लक्षणे शरीरात दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. टीबी या गंभीर आजारावर त्वरित उपचार घेणे गरजेचं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगातील सर्वाधिक क्षयरोग रुग्ण भारतात आढळतात. 2020 मध्ये जगातील एकूण टीबी रुग्णांपैकी सुमारे 27 टक्के रुग्ण भारतात आढळले आहेत. दरवर्षी लाखो लोक या आजाराने प्रभावित होत असल्याने हा सार्वजनिक आरोग्याचा एक गंभीर प्रश्न ठरत आहे, अशी माहिती आहे.
क्षयरोग हा जिवाणूंमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने आपल्या फुफ्फुसांवर परिणाम करतो. मात्र काही वेळा तो मेंदू, मणका, मूत्रपिंड यांसारख्या अवयवांवरही परिणाम करू शकतो. संक्रमित व्यक्ती खोकताना किंवा शिंकताना हा आजार हवेतून पसरतो. योग्य उपचार न घेतल्यास तो जीवघेणा ठरू शकतो, पण वेळेत उपचार केल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.
सतत खोकला, ताप, वजन कमी होणे, थकवा अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे.
टीबी झाल्यास अनेक महिने औषधे घ्यावी लागतात. पूर्ण कोर्स न घेतल्यास औषधांना न जुमानणारा टीबी होऊ शकतो.
खोकताना किंवा शिंकताना रुमाल, टिश्यू किंवा कोपर वापरा. घरात हवा खेळती राहिल याची काळजी घा व आपल्या घरांत तसेच आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखा.
संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
टीबी हवेतून पसरत असल्यामुळे संक्रमित व्यक्तीने मास्क वापरल्यास संसर्ग रोखता येतो.
भारताला क्षयरोगमुक्त करण्यासाठी शासनासोबतच नागरिकांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. वेळीच उपचार, स्वच्छता आणि जागरूकता यामुळे क्षयरोगावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.
- डॉ. शाहिद पटेल, फुफ्फुसविकार तज्ज्ञ, मेडिकव्हर हॉस्पिटल, खारघर, नवी मुंबई
महत्त्वाच्या इतर बातम्या:
कापलेल्या शीराचं रहस्य उलगडणार Kaattaan, ते मर्दानी 3चा धाक; या आठवड्यात OTTवर मनोरंजनाचा धमाका