Aamir Khan Engaged With Girlfriend Gauri Spratt: बॉलिवूडचा (Bollywood News) 'मिस्टर परफेक्शनिस्ट' (Mr. Perfectionist) आमिर खान (Aamir Khan) लवकरच आपला तिसरा संसार थाटणार की, काय? अशा चर्चा सुरू आहेत. त्यासाठी कारणंही तसंच आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आमीर खाननं आपली पत्नी गौरी स्प्रॅट (Gauri Spratt) हिच्याशी साखरपुडा उरकल्याचं बोललं जातंय. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये गौरी आणि आमीर खान दोघांच्याही हातात असलेल्या चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या अंगठ्यांनी सर्वांचं लक्ष वेधलंय. तसं पाहायला गेलं तर, आमीर खाननं वयाची साठी ओलांडली आहे. आतापर्यंत त्यानं दोन लग्न केलीत आणि दोन्ही पत्नींना घटस्फोट दिलाय. दोन्ही पत्नींपासून त्याला एकूण तीन मुलं आहेत. पण, तरीसुद्धा त्यानं सर्वांसमोर त्याचं प्रेम मान्य केलं आणि सर्वांना त्याची प्रेयसी गौरीची ओळखही करुन दिली.
नुकत्याच एका कार्यक्रमात तो गौरीचा हात हातात घेऊन वावरताना दिसला होता. याच कार्यक्रमातला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये गौरी आणि आमीर खानच्या हातातल्या अंगठ्या पाहायला मिळाल्या. त्या अंगठ्या पाहून दोघांनी गपचूप साखरपुडा उरकल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
तसं पाहायला गेलं तर, आमीर खाननं फार पूर्वीच त्याचा लग्न करण्याचा कोणताही प्लान नसल्याचं स्पष्ट केलेलं. त्यामुळे सध्या त्यानं गपचूप साखरपुडा उरकल्याच्या चर्चांना तसं काहीच तथ्य नाही. या निव्वळ अफवा आहेत. आमीर खाननं माध्यमांशी बोलताना आधीच स्पष्ट केलेलं की, आपण आपल्या अंतर्मनात आणि विचारांमध्ये त्यानं गौरीशी आधीच लग्न केलेलं.

वस्तुस्थिती अशी आहे की, आमिरनं नुकत्याच गौरीसाठी दोन अत्यंत खास आणि दुर्मिळ रत्नांच्या अंगठ्या बनवून घेतल्या आहेत. या अंगठ्या जगातील काही सर्वात अनन्यसाधारण आणि मौल्यवान रत्नांचा वापर करून घडवण्यात आल्या असल्याची माहिती मिळतेय. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कारागिरांना अनेक तास लागले. या दोन्ही अंगठ्या 'QWEEN' या लक्झरी दागिन्यांच्या ब्रँडकडून बनवून घेण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या ब्रँडचे अधिकृत लाँचिंग अद्याप झालेलंही नाही. तरीही, आमिर खान हा या ब्रँडच्या सुरुवातीच्या ग्राहकांपैकी एक बनला आहे. गौरीच्या बोटात नुकतीच जी सुंदर फिकट निळ्या रंगाची अंगठी दिसून आली होती, ती प्रत्यक्षात या दोन अंगठ्यांपैकीच एक आहे.
केवळ एकाच अंगठीची निवड करण्याऐवजी, आमिर खाननं गौरीसाठी दोन अंगठ्या खास घडवून घेण्याचं ठरवलं. मीडिया रिपोर्टनुसार, आमीर खानचं असं माननं आहे की, "प्रेमाला केवळ एकाच भावनेमध्ये सामावून घेता येत नाही...", म्हणूनच, नात्याच्या विविध पैलूंचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यानं दोन अंगठ्यांची निवड केली आहे. या विशेष अंगठ्यांमध्ये 'अक्वामरीन' (एक निळं रत्न) आणि 'माणिक' (एक लाल रत्न) यांचा समावेश आहे. या दोन्ही रत्नांची निवड त्यांच्या अंगभूत सौंदर्यामुळे आणि दुर्मिळतेमुळे करण्यात आली. पहिल्या अंगठीमध्ये ब्राझीलमधून प्राप्त झालेला, तेजस्वी निळ्या रंगाचा अक्वामरीन रत्न शोभून दिसतोय. ज्याच्या भोवती हिऱ्यांचं अत्यंत सुबक नक्षीकाम केलंय. दुसरी अंगठी मादागास्करमधून आलेल्या, उच्च दर्जाच्या माणिक रत्नानं सुशोभित करण्यात आली आहे. या दोन्ही रत्नांना विशेष महत्त्वही दिलं जातं. माणिक हे प्रेम आणि उत्कटतेचं प्रतीक मानलं जातं, तर अक्वामरीन हे मनाची शांतता, विचारांमधील स्पष्टता आणि भावनिक खोली यांचे प्रतिनिधित्व करतं.