Shweta Mahale vs Sanjay Gaikwad :संजय गायकवाड म्हणाले, कुणाची माय व्याxxx, श्वेता महालेंचं उत्तर
Marathi March 24, 2026 06:25 PM

Shweta Mahale vs Sanjay Gaikwad :संजय गायकवाड म्हणाले, कुणाची माय व्याxxx, श्वेता महालेंचं उत्तर

बुलढाणा : सातारा जिल्हा परिषद निवडणुकी भाजप विरुद्ध शिवसेना सामना रंगला असतानाच बुलढाणा जिल्ह्यातही शिवसेना आमदाराने भाजपला थेट चॅलेंज दिलंय. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयात चिखली विधानसभा मतदारसंघातील विविध गावातील आणि विविध पक्षातील सहाशे कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांवर, मित्र पक्षाकडून अन्याय होत असल्याबाबत बोलताना भाजपला थेट आव्हान देण्यात आलंय. यापुढे जर मित्रपक्षाने कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय केला तर गाठ माझ्याशी आहे, कोणाची माय ** नाही, अशा शब्दात संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी जिल्ह्यातील भाजप नेत्यांना उद्देशून टीका केलीय.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज विधानसभेत सातारा जिल्हा परिषदेतील वादावरुन भाजप आणि शिवसेना मंत्री सभागृहातही भिडल्याचं पाहायला मिळालं. तर, ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचारावरुन भाजप आमदारानेही एकनाथ शिंदेंना घेरलं. एकीकडे भाजप-शिवसेनेतील हा वाद सुरू असतानाच बुलढाण्यातही अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. संजय गायकवाड यांनी भाजप आमदाराला थेट इशाराच दिलाय. “निवडणुकीत आपल्या नेत्याला जिंकून येण्यासाठी कार्यकर्ता काय काय टोले घेत असतो हे त्याच कार्यकर्त्याला माहित असतं. चिखली मतदारसंघात हे चित्र आम्ही बघत आहोत. मात्र, आम्ही मित्र पक्ष म्हणून दुर्लक्ष केलं. बाकी गोष्टी मी तुमच्या मतदारसंघात भाषण करेल त्यावेळेस बोलेल. कार्यकर्त्यांचा छळ किती करायचा? मी त्या मतदारसंघात (चिखली) बघितलं की, खूप त्रास त्या कार्यकर्त्यांना आहे. आता ते प्रकरण माझ्याकडे आलं आहे, आता कुणाची माय ** नाही. आता मी बघतो ते कुणाकुणाला त्रास देतात, अशा शब्दात संजय गायकवाड यांनी भाजपला इशारा दिलाय.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.