यंदाची रामनवमी चार राशींना ठरणार शुभ ! शुक्राच्या संक्रमणामुळे होणार प्रगती आणि नव्या वस्तूंची खरेदी
esakal March 25, 2026 12:45 AM

Marathi Rashi Bhavishya : 26 मार्च 2026ला शुक्र ग्रहाचं मेष राशीमध्ये संक्रमण होणार आहेत. राम नवमीच्या दिवशी हा शुभ संयोग घडून येणार आहे. सुख सुविधा, प्रेम यांचा कारक असलेल्या शुक्र अश्विनी नक्षत्राच्या प्रथम चरणामध्ये मेष राशीत प्रवेश करणार आहे यामुळे काही राशींना फायदा होणार आहे तर काही राशींना संमिश्र जाणार आहे.

मेष राशीच्या पहिल्या घरात हे संक्रमण होणार आहे. त्यामुळे तुमची वेगाने प्रगती होईल. तुमच्यातील आत्मविश्वासात वाढ झाली असेल. तुमचं वैवाहिक आयुष्य उत्तम असेल. जुन्या नातेवाईकांबरोबरच नवीन नात्यांमध्येही चांगला बॉन्ड निर्माण होईल. व्यवसायिकांना मानसन्मान प्राप्त होईल. सुख सुविधांवर खर्च कराल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील.

उपाय - शुक्रवारी सफेद मिठाई किंवा तांदळाचे दान करा.

वृषभ रास :

वृषभ राशीच्या बाराव्या घरात शुक्राचं संक्रमण होणार आहे. प्रेमसंबधात दुरावा येईल. वैवाहिकांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होईल. करियरमध्ये प्रगती होईल. परदेशाशी संबधित चांगला लाभ होईल. या काळात तुम्ही अधिक खर्च कराल.

उपाय - शुक्रवारी “ॐ द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः” मंत्राचा 108 वेळा जप करा.

मिथुन रास :

शुक्राचं संक्रमण मिथुन राशीच्या अकराव्या घरात होणार आहे. तुम्हाला मित्रांची मदत मिळेल. विवाहितांना जोडीदाराची साथ मिळेल. भागीदारीतील कामं यशस्वी होतील. व्यापारी वर्गाला चांगलं यश मिळेल. मोठ्या भावंडांची मदत मिळेल.

उपाय - तुमच्या इच्छांवर नियंत्रण ठेवा आणि लोभ करू नका.

कर्क राशीच्या दहाव्या म्हणजे कर्म भावात हे संक्रमण होणार आहे. त्यामुळे तुम्ही कामात अधिक व्यस्त असाल. सरकारी कार्यालय, मीडिया, फॅशन आणि कला या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ असेल. या काळात पदोन्नती मिळेल. कुटुंबात मानसन्मान वाढेल.

उपाय - शुक्रवारी लक्ष्मी मातेला सफेद फूल किंवा मिठाई यांना अर्पण करा.

सिंह रास :

सिंह राशीच्या नवव्या भावात हे संक्रमण होणार आहे. या दरम्यान भाग्यात वाढ होईल. काही लोक अधिक प्रवास करतील. सिंह राशीच्या लोकांसाठी जीवन सुखी असेल. शिक्षण, कायदा आणि प्रवास क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ लाभदायक असेल. कुटुंबात शांतता असेल.

उपाय - शुक्रवारी लक्ष्मी मातेला सफेद फूल अर्पण करा.

कन्या रास :

कन्या राशीच्या लोकांच्या आठव्या घरात संक्रमण होणार आहे. तुमच्या नात्यांमध्ये भावनिक विश्वासाची गरज भासेल. विवाहित व्यक्तींनी नात्यांमध्ये संशय घेऊ नये. जोडीदारामुळे अनपेक्षित फायदा होईल. जोखमीच्या गुंतवणुकी करू नका.

उपाय - शुक्रवारी “ओम ड्रम ड्रिम ड्रॉम सह शुक्राय नमः” या मंत्राचा 108 वेळा जप करा.

तूळ रास :

शुक्र राशीच्या सातव्या स्थानात संक्रमण करणार आहे. हा काळ तुमच्या नातेसंबधांवर वैवाहिक आणि सामाजिक जीवनावर परिणाम करणार आहे. या काळात प्रेमजीवनात उत्साह असेल. नवीन नातेसंबंध सुरू होतील. अहंकारामुळे होणारे संघर्ष टाळा. व्यावसायिक भागीदारी आणि कायदेशीर बाबींचा फायदा होईल.

उपाय - नात्यांमध्ये सहकार्य करा आणि संयम बाळगा.

वृश्चिक रास :

वृश्चिक राशीच्या सहाव्या घरात शुक्राचं भ्रमण हॉट आहे. हे भ्रमण नात्यांमध्ये शिस्त आणेल. प्रेमसंबंधामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. विवाहितांनी विनाकारण भांडणं टाळावीत. आर्थिक खर्च वाढेल. कामाच्या दबावामुळे कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाही. आरोग्याची काळजी घ्या.

उपाय - तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

धनु रास :

धनु राशीच्या पाचव्या घरात शुक्र संक्रमण करणार आहे. तुमच्या ज्ञानात वाढ होईल. तुम्ही आनंदी असाल. विवाहितांना मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. शिक्षण, मनोरंजन आणि कला क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ आहे. घरात आनंदाचे वातावरण असेल.

उपाय - दर शुक्रवारी मिठाई दान करा.

मकर रास :

शुक्र चौथ्या घरातून भ्रमण करेल. यामुळे तुम्हाला कौटुंबिक सुख मिळेल. थोडा आराम मिळेल. विवाहित व्यक्ति जोडीदाराबरोबर उत्तम वेळ घालवतील. आर्थिक दृष्टीने घरातील सुखसोयी, घराची खरेदी यावर खर्च कराल. आई आणि तुमचं नातं सुधारेल.

उपाय - देवी लक्ष्मीला पांढरी फुले अर्पण करा.

कुंभ रास :

कुंभ राशीच्या तिसऱ्या घरातून शुक्र भ्रमण करणार आहे. त्यामुळे तुमचं संवाद कौशल्य वाढेल. प्रेमसंबंध दृढ होतील. विवाहितांचे जोडीदारबरोबर संबंध सुधारतील. लेखन, माध्यम आणि जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी उत्तम काळ आहे. वैयक्तिक प्रयत्नांना यश मिळेल.

उपाय - आपल्या भावंडांशी आणि जोडीदाराशी संबंध चांगले ठेवा.

मीन रास :

शुक्र मीन राशीच्या दुसऱ्या घरातून संक्रमण करतोय. प्रेमसंबंधांमध्ये पाठिंबा मिळेल. विवाहितांना आर्थिक स्थैर्य मिळेल. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न आणि बचतीमध्ये लक्षणीय वाढ होईल. आरोग्य चांगले असेल.

उपाय - 'ओम ड्रम ड्रिम ड्रौम सह शुक्रे नमः' या मंत्राचा जप दर शुक्रवारी 108 वेळा करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.