RCB नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगमधील (IPL) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या टीमची विक्री करण्यात आली आहे. अमेरिकन उद्योजक कल सोमानी यांच्या संघानं राजस्थान रॉयल्सला 1.63 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 15286 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. राजस्थान रॉयल्सनंतर, आता आरसीबीलाही (RCB) नवीन मालक मिळाला आहे. आदित्य बिर्ला ग्रुपच्या नेतृत्वाखालील एका संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (Royal Challengers Bengaluru) संघ 1.78 अब्ज अमेरिकी डॉलरमध्ये विकत घेतला आहे. आदित्य बिर्ला ग्रुप, टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोन इन्व्हेस्टमेंट कंपनी यांनी संयुक्तपणे आरसीबी फ्रँचायझी 16,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकत घेतली आहे. त्यांनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडकडून बंगळूर संघाची 100 टक्के मालकी मिळवली आहे.
RCB आयपीएलमधील सर्वात महागडा संघ, किती कोटींचा करार, नवा मालक कोण?
आदित्य बिर्ला ग्रुपचे संचालक आर्यमन विक्रम बिर्ला हे आरसीबी फ्रँचायझीचे अध्यक्ष असतील, तर टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे सत्यन गजवानी उपाध्यक्ष असतील. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर हा आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्सला 6 धावांनी पराभूत करून गतविजेता ठरला आहे. यापूर्वी, कल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील एका संघाने राजस्थान रॉयल्सला 1.63 अब्ज अमेरिकी डॉलरमध्ये, म्हणजेच अंदाजे 15,286 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा करार 16,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेत झाला आहे. या करारानुसार, नवीन ग्रुप आरसीबीच्या पुरुष आणि महिला संघांचाही मालक असेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आयपीएल 2026 मधील आपला पहिला सामना 28 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळेल. आरसीबीचा पुढील सामना 5 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होईल. 10 एप्रिल रोजी त्यांचा सामना राजस्थान रॉयल्सशी आणि 12 एप्रिल रोजी पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सशी होईल. आजपर्यंत, आरसीबी संघाने आयपीएल आणि डब्ल्यूपीएलमध्ये मिळून दोन ट्रॉफी जिंकल्या आहेत. महिला संघाने 2024 मध्ये विमेन्स प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले. 2025 मध्ये, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील बंगळूर संघाने आयपीएल ट्रॉफी उंचावली.
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जैकब बेथेल, जोश हॅजलवुड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिख सलाम, अभिनंदन सिंह, सुयश शर्मा, व्यंकटेश अय्यर, जैकब डफी, सात्विक देसवाल, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विक्की ओस्टवाल विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान
हे सुद्धा वाचा: