उंची 6 फुट, वय वर्ष 66 अन् डोळांत अंगार; सर्वाधिक 1000 कोटींच्या फिल्म्स देणारा सुपरस्टार, ओळखलं का कोण?
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क March 25, 2026 10:13 AM

Sanjay Dutt 1000 Crore Movies List: भारतीय सिनेसृष्टीत (Indian Film Industry) बॉक्स ऑफिसवर (Box Office) दररोज नवनवे विक्रम घडत असतात, काही कलाकार असे असतात, जे स्वतःच्या उपस्थितीनंच प्रत्येक सीनला वेगळी उंची देतात. असाच एक दमदार आणि मोठ्या पडद्यावर जादू करणारा चेहरा म्हणजे, संजय दत्त (Sanjay Dutt). चाहत्यांचा लाडका 'संजू बाबा'. नव्वदचं दशक गाजवणारा हा वर्सटाईल अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt 1000 Crore Movies List) म्हणजे, बॉलिवूडचा टॉप स्टार. आजही त्याचा तोच रुबाब, तीच स्टाईल आणि तोच स्क्रीन प्रेझेन्स कायम आहे.

नव्वदच्या दशकात मुख्य भूमिकांमध्ये झळकलेला हा अभिनेता आज तसा लीडमध्ये फार कमी दिसत असला तरीसुद्धा सपोर्टिंग भूमिकांमधून मात्र तो आपली छाप सोडायला विसरत नाही. विशेष म्हणजे, त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा इतक्या प्रभावी आणि मनाला भिडणाऱ्या असतात की, अनेकदा त्या सिनेमाच्या मुख्य अभिनेत्यावरही भारी पडतात. त्यामुळेच 1000 कोटींचा टप्पा गाठणाऱ्या अनेक मोठ्या सिनेमांमध्ये त्यांची ठसठशीत छाप दिसून येते आणि हाच त्यांच्या स्टारडमचा खरा पुरावा ठरतो.

कोणत्या फिल्मपासून सुरू झालेली संजू बाबाची तुफानी कारकीर्द? (Sanjay Dutt Career)

बॉलिवूडचा खलनायक म्हणून ओळखला जाणारा नव्वदच्या दशकातला सुपरस्टार आजही आपलं स्टारडम जपून आहे. संजू बाबा पडद्यावर दिसणार म्हणजे, नक्कीच काहीतरी तुफानी पाहायला मिळणार हे ठरलेलं. खरं तर, संजू बाबाची तुफानी कारकीर्द साऊथ सिनेमा KGF: Chapter 2 पासून सुरू झाली. या फिल्ममध्ये संजय दत्तनं खुंखार अधीराची भूमिका साकारली आहे. त्याचा तो खोल आवाज आणि धडकी भरवणाऱ्या नजरेनं थिएटरमध्ये सर्वांची धडधड वाढवलेली. या फिल्मनं वर्ल्डवाइड 1200 कोटींहून अधिक कमाई केलीय. 

संजू बाबानं केजीएफमध्ये केलेल्या कामाची तुफान चर्चा झाली. त्यानंतर आलेल्या जवानमध्ये किंग खान आणि संजय दत्त ही जोडी दिसली. इथे संजय दत्तनं शाहरुखसोबत पॉवरफुल सपोर्टिंग भूमिका साकारली होती. हाय-ऑक्टेन अॅक्शन ड्रामानं 1160 कोटींची कमाई केलेली. दरम्यान, खरी जादू दिसली 'धुरंधर'मध्ये. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या स्पाय थ्रिलर सिनेमामध्ये, संजय दत्तनं निर्दय खलनायकाची भूमिका इतक्या तीव्रतेनं साकारली की, प्रेक्षक त्याच्यावरून आपली नजर हटवू शकले नाहीत. विक्रमांची मालिका रचत, या सिनेमानं 1,300 कोटींहून अधिक कमाई केलीय.

हा संजू बाबांचा 1,000 कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवणारा तिसरा चित्रपट ठरला. 'धुरंधर 2'सह, ते सलग चौथा 1000 कोटींच्या पार कमाई करणारा सिनेमा देण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मात्र, ही केवळ आकड्यांची जादू नाही, तर ही आहे, संजू बाबांच्या त्या अविश्वसनीय व्यक्तिमत्त्वाची जादू, जी ते साकारत असलेल्या प्रत्येक पात्रात प्राण फुंकते.

Harish Rana Biopic: 13 वर्षांची प्रतीक्षा, मौन अन् वेदना… हरीश राणांची हृदयद्रावक कहाणी आता मोठ्या पडद्यावर? निर्मात्यांनी घेतली वकिलांची भेट

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.