Pune Infrastructure Projects Latest Update News : पुण्यातील तळेगाव आणि चाकणमध्ये होणाऱ्या वाहतूककोंडीवर कामयचा तोडगा काढण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पुणे जिल्ह्यात ४ पदरी नव्या उन्नत महामार्गाला मान्यता दिली आहे. पायाभूत सुविधा समिती बैठक संपन्न झाली, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सुलभ दळणवळणासाठी महामार्गाचे जाळे विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये पुण्याला नवा उन्नत मार्ग मिळाला आहे.
पुणेजिल्ह्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे येथे निश्चितच औद्योगिक विकासास मदत होणार आहे. पुणे शहर परिसराची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी महामार्गाची कामे होणे अत्यंत गरजेचे आहे. राज्यातील दळणवळण अधिक सुलभ होण्यासाठी महामार्गाचे जाळे विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. पुणे जिल्ह्यात तयार होणाऱ्या नव्या उन्नत महामार्गामुळे वाहतूककोंडीची कटकट कायमची संपणार आहे.
लोकलला अचानक मोठा झटका बसला; भीतीनं घामाघूम प्रवाशांच्या ट्रेनमधून धडाधड उड्या, दादर स्टेशनवर थरारपुणेजिल्ह्यातील तळेगाव ते चाकण क्रमांक ५४८ डी राष्ट्रीय महामार्गावरील ० ते २६ किलोमीटर दरम्यान ४ पदरी उन्नत आणि ४ पदरी जमिनीस समांतर महामार्गासह याच महामार्गावर चाकण ते शिक्रापूर दरम्यान पुढे २६ ते ४३ किलोमीटर लांबीमध्ये ४ पदरी जमिनीस समांतर महामार्गाची डीएफबीओटी (डिझाईन, फायनान्स, बिल्ट, ऑपरेट ॲन्ड ट्रान्सफर) पद्धतीने सुधारणा करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार? एकाचवेळी ३००० येणार? महत्त्वाची तारीख आली समोरया महामार्गाची कामे पूर्ण झाल्यानंतर चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदत होणार आहेत. त्यामुळे ही कामे दर्जेदार व विहित कालमर्यादेत पूर्ण करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित आदी उपस्थित होते.
Election : पुण्यात निवडणुकीचं बिगुल वाजलं, २६ ग्रामपंचायतीत धुरळा उडाला, वाचा सविस्तर