आमिर खानने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत साखरपुडा केल्याची चर्चा रंगली आहे.
गौरी स्प्रॅटच्या बोटात रत्नजडित अंगठी पाहायला मिळत आहे.
आमिर खानने वाढदिवसाला आपल्या गर्लफ्रेंडची ओळख सर्वांना करून दिली.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान कायम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अशात आता त्याच्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यावरून असे बोले जात आहे की, आमिर खानने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत गुपचूप साखरपुडा केला आहे. व्हायरल व्हिडीओत दोघांच्याही बोटांमध्ये हिऱ्याच्या अंगठ्या चमकताना दिसत आहे.
वयाच्या 61 व्या वर्षी आमिर खानने साखरपुडा केल्याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. व्हिडीओत आमिरआणि गौरी एकमेकांचे हात धरून चालताना दिसत आहेत. दोघे एकत्र खूपच सुंदर, आनंदी दिसत आहेत. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. आमिर खानने आपल्या वाढदिवसाला गौरी स्प्रॅटची ओळख चाहत्यांना करून दिली. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
नेमकं सत्य काय?'आज तक'च्या रिपोर्टनुसार, आमिर आणि गौरीचा साखरपुडाया अफवा आहेत. आमिरने अलिकडेच गौरीसाठी दोन अत्यंत खास रत्नांच्या अंगठ्या दिल्या आहेत. आमिरने एकाऐवजी दोन अंगठ्याघालण्यामागचे कारण की, त्याचा विश्वास आहे की, "प्रेम एकाच भावनेने व्यक्त करता येत नाही..." म्हणून त्याने नात्यातील वेगवेगळ्या पैलूंचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दोन अंगठ्या निवडल्या. या खास अंगठ्यांमध्ये ॲक्वामरीन (निळा खडा) आणि माणिक (लाल खडा) आहेत.
View this post on Instagram
आमिरने एका मुलाखतीत अधीच सांगितले होती की, "त्याच्या मनाने आणि हृदयाने आधीच गौरीशी लग्न केले आहे..." अद्याप या व्हायरल व्हिडीओवर आणि साखरपुड्यावर कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. आमिर खानने ही खास अंगठी गौरीसाठी बनवून घेतली आहे. हा साखरपुडा नसून गौरीला दिलेली एक अनमोल भेट आहे.
Famous Actress Photos : हातात वॉकर अन्...; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पायाला गंभीर दुखापत, अवस्था पाहून चाहते चिंतेत