प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
हातात वॉकर घेऊन अभिनेत्रीने फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्री टिव्ही इंडस्ट्रीचा प्रसिद्ध चेहरा आहे.
टिव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर दुखापत झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून तिने या संबंधित माहिती चाहत्यांना दिली आहे. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' फेम अभिनेत्री शिवानी रांगोळेच्या पायाला दुखापत झाली आहे. तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. सध्या ती 'शंकर जयकिश' या नाटकामुळे चांगलीच चर्चेत आहे. पायाला दुखापत झाली असतानाही अभिनेत्रीने नाटकाचा प्रयोग केला आहे.
View this post on Instagram
"नाटककरायला एका पायावर तयार, पायाला दुखापत झाली तेव्हा प्रयोग कसे होणार ह्याचं टेन्शन होतं. पण नाट्यगृहात पायठेवण्याच्या क्षणापासून ते मेकअप रूममध्ये मला तयार होताना मदत करणं, नाटका आधीचा जो प्रॉपर्टी चेक मी करते तो माझ्या वतीने करून ठेवणं, मला चालायला वेळ लागतो म्हणून ब्लॅकआउटचा अवधी वाढवणं, नाटकात काही मूव्हमेंट्स ऐनवेळी माझ्या सोयीनी बदलणं, नाटक झाल्यावर मला गाडीपर्यंत सुखरूप सोडणं, हे सगळं माझ्या शंकर जयकिशनच्या सगळ्या टीमनी केलं...
मला कित्येकदा पायात splinter आहे ह्याची जाणीव ही व्हायची नाही, उत्साहात मी स्टेजवर वावरायचे तेव्हाभरत जाधव सर आणि महेश मांजरेकर सर मला आठवण करून द्यायचे, मला सांभाळून घ्यायचे...तेव्हा खूप कृतज्ञता वाटली! स्टेज वर जाईपर्यंत टेन्शन असायचं की पायामुळे प्रयोग कसा होईल, पण एकदा प्रेक्षकांचा आवाज ऐकला की हुरूप यायचा! आता हळूहळू recovery होते आहे पण माझ्या टीमसाठी आणि प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात!"
View this post on Instagram
शिवानी रांगोळेने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्स करून तिचे कौतुक करत आहेत. तसेच तिच्या तब्येतीची विचारपूस करत आहे. लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत.
वर्कफ्रंटअभिनेत्री शिवानी रांगोळे हिने आजवर मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो. 'शंकर जयकिश' नाटकात ती मराठी दिग्गज अभिनेते भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्यासोबत झळकली आहे. तसेच अलिकडेच ती 'बे दुने तीन' या चित्रपटात झळकली आहे. तिला आपल्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
Famous Actress Death: भीषण कार अपघातामध्ये ३० वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू, अपघाताचा थरारक VIDEO समोर