प्रसिद्ध अभिनेत्रीचे वयाच्या 30 व्या वर्षी निधन झाले आहे.
कार डिव्हायडरला धडकली आणि उलटी झाली.
अभिनेत्रीच्या अपघाती मृत्यूने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री आणि मॉडेल हर्षिल कालिया हिचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. सोमवारी रात्री जयपूरमध्ये तिचा गाडीचा भीषण अपघात झाला. तिच्या गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती डिव्हायडरला धडकली. संपूर्ण घटना सविस्तर जाणून घेऊयात. हर्षिल कालियाच्या अशा अचानक जाण्याने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जयपूरमधील शिप्रा पथ रोडवर हर्षिल कालिया हिच्या गाडीचा अपघात झाला. रात्री सुमारे साडेअकरा वाजता हर्षिल कालिया कामावरून घरी परतत असताना तिची गाडी डिव्हायडरला धडकून उलटली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीफुटेजमध्ये कैद झाली आहे. हर्षिल कालियाची गाडी उलटल्यानंतर स्थानिकांनी गाडी सरळ करून अभिनेत्रीला बाहेर काढले. ३० वर्षीय अभिनेत्रीला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे.
हर्षिल कालिया यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयातीलडॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघाताचे नेमके कारण पोलिसांनी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी शवविच्छेदन करून हर्षिल कालिया यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, ते या गोष्टीचा तपास घेत आहेत की, ते वाहन भरधाव वेगात होते का किंवा दुसऱ्या वाहनाने त्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता का?
View this post on Instagram
हर्षिल कालिया 'क्राईम नेक्स्ट डोअर' या वेब सीरिजमध्ये दिसली आहे. तिने एका न्यूज चॅनलसाठी अँकर म्हणूनही काम केले आहे आणि अनेक राजस्थानी गाण्यांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. अलीकडेच, ती मॉडेलिंगमध्ये करिअर करताना दिसत होती. हर्षिल कालियाला लहानपणापासून कला क्षेत्राची आवड होती. तिने नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. तिने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या होत्या.
Ranveer Singh : 'धुरंधर २'च्या सेटवर रणवीर सिंह झाला होता गंभीर जखमी; शुटिंगदरम्यान नेमकं काय घडलं? सहकलाकाराने सगळंच सांगितलं