मालमत्ता आणि वारसा हक्क यामुळे भारतात असंख्य कौटुंबिक वाद होतात. त्यातही सासूच्या मृत्यूनंतर त्यांच्या दागिन्यांवर नेमका हक्क कोणाचा? मुलीचा की सुनेचा? असा प्रश्न अनेक घरांमध्ये भांडण होतात. आज आपण याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
भारतीय वारसा हक्क कायद्यानुसार, दागिने ही स्व-अर्जित मालमत्ता मानली जाते. जर सासूबाईंनी त्यांच्या हयातीत कायदेशीर मृत्यूपत्र केले असेल, तर त्यातील तरतुदींनुसारच दागिन्यांचे वाटप होते. मृत्यूपत्रात त्यांनी सून, मुलगी किंवा अन्य कोणाचेही नाव वारस म्हणून नोंदवले असेल, तर कायदेशीररित्या त्याच व्यक्तीला तो हक्क मिळतो.
पण जर जर सासूबाईंनी कोणतेही मृत्यूपत्र केले नसेल, तर दागिन्यांचे वाटप हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ नुसार केले जाते. या कायद्यानुसार मालमत्तेचे वाटप प्रथम श्रेणीच्या वारसांमध्ये (Class-1 Heirs) केले जाते. यामध्ये मृत व्यक्तीचा पती, मुले आणि मुली यांचा समावेश होतो.
थोडक्यात सांगायचे तर, मृत्यूपत्र नसताना सासूच्या दागिन्यांवर पहिला कायदेशीर अधिकार हा मुलगी आणि मुलाचा असतो, सुनेचा नाही. (टीप: ही माहिती केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कायदेशीर गुंतागुंत असल्यास तज्ज्ञ वकिलाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)