LPG Crisis: एलपीजी सिलेंडरसाठी लांबच लांबा रांगा; 8 वी पास व्यक्तीने तयार केला 'विश्वगुरु चूल', का होतेय Viral
Tv9 Marathi March 25, 2026 07:45 PM

LPG Crisis: राजस्थानमधील उदयपूर येथील मोहम्मद शेर खान यांनी त्यांच्या कौशल्यावर विश्वगुरु चूल तयार केली आहे. ही चूल सध्या चर्चेत आली आहे. शेर खान हे केवळ 8 वीपर्यंत शिकले आहेत. पण त्यांनी कष्ट आणि कौशल्यावर आधारीत चूल तयार केली आहे. ही चूल एकदम खास आहे. या चुलीवर विविध पदार्थ तयार करता येतात. खान हे लोहा आहेत. गेल्या जवळपास 27 वर्षांपासून ते लोखंड आणि इतर धातूपासून वस्तू तयार करतात. सध्या सिलेंडर मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तरीही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने नागरिक आता पर्यायांकडे वळाले आहेत. ग्रामीण भागात आजही चुलीचा वापर होतो. त्यासाठी लाकूड, जळतण, कचरा, गोवऱ्यांचा वापर होतो. पण धूरामुळे महिलांना त्रास होतो. पण विश्वगुरू चुलीत या गोष्टींना फाटा देण्यात आला आहे.

3-इन-1 चूल, कमी इंधनात मोठे काम

विश्वगुरु चुलीचे एक खास वैशिष्ट्य आहे. ही चूल 3-इन-1 पद्धतीने काम करते. सगळ्यात खाली दाळ अथवा भाजी तयार होते. मध्यभागी पदार्थ तळण्यासाठी कढई ठेवता येते. तर वरच्या बाजूला भाकर भाजते अथवा रोडगे शेकता येतात. या चुलीला केवळ 2 किलो लाकडं लागतात. 30 मिनिटांमध्ये 25–30 लोकांचा स्वयंपाक तयार करता येतो. या चुलीची डिझाईन अशी आहे की त्यामुळे उष्णता वाया जात नाही. धूर पण कमी होतो. त्यामुळे पर्यावरण आणि आरोग्याला जास्त अपाय होत नाही.

View this post on Instagram

A post shared by Vishwa guru Chulha Demo, Udaipur (@mohammadsher461)

सोशल मीडियावर व्हायरल झाला Video

शेर खान यांनी चुलीचा डेमो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये एकाच वेळी दाळ,रोडगे आणि इतर अन्न पदार्थ तयार करता येतो. हा व्हिडिओ व्हायरल झाला. या देशी जुगाडाची एकच चर्चा रंगली. सध्या गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगेत उभे राहूनही सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. ते आता विविध पर्याय शोधत आहेत. सरकार गॅस बुकिंग नियमात बदल झाला नसल्याचा आणि गॅस तुटवडा नसल्याचा दावा करत असले तरी नागरीक मात्र रांगेत उभे आहेत.

किंमत आणि वाढती मागणी

दाव्यानुसार, शेर खान यांनी आतापर्यंत 10,000 हून अधिक चुलींची विक्री केली आहे. या चुलीची किंमत जवळपास 6,500 रुपये ते 10,000 रुपयांदरम्यान आहे. ही चूल खासकरून मोठे कुटुंब, गाव, मोठ्या हॉटेल्स आणि साध्या हॉटेल्ससाठी उपयोगी ठरत आहे. विशेष म्हणजे शहरी भागातही या चुलीला मोठी मागणी असल्याचा दावा करण्यात येत आहे. काची कचऱ्यावर पण स्वयंपाक होत असल्याने निम्न शहरात या चुलीला मागणी आली आहे.

(Disclaimer: ही बातमी समाज माध्यमांवर युझर्सने केलेल्या पोस्टआधारे तयार केली आहे. टीव्ही ९ मराठी त्याची पुष्टी करत नाही.)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.