न्यूझीलंड मेन्स क्रिकेट टीमला मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20i मालिका गमवावी लागली. दक्षिण आफ्रिकेने पाचव्या आणि निर्णायक सामन्यात न्यूझीलंडवर 33 धावांनी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 5 सामन्यांची मालिका 3-2 अशा फरकाने आपल्या नावावर केली. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडच्याच वुमन्स टीमसमोर संपूर्ण दक्षिण आफ्रिकेने गुडघे टेकले. न्यूझीलंडने कॅप्टन अमेलिया केर हीने केलेल्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजय मिळवला. न्यूझीलंड वुमन्स क्रिकेट टीमने अशाप्रकारे ही मालिका 4-1 अशा फरकाने नावावर केली. अमेलिया केर न्यूझीलंडच्या विजयाची नायिका ठरली.