बुध ग्रह सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. कुंभ राशी ही शनी ग्रहाची आहे. लवकरच बुध ग्रह गुरूच्या मीन राशीत गोचर करणार आहे. बुध ग्रहाच्या या चालींमुळे अनेक राशींच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत. काही राशींच्या नशिबात तर मोठा धनलाभ आहे.
वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात 11 एप्रिलनंतर मोठा धनलाभ येऊ शकतो. अडकून पडलेले काम मार्गी लागू शकते. न्यायालयीन वाद मिटू शकतो. अचानकपणे कुटुंबाला एक आनंदाची बातमी मिळू शकते. आर्थिक व्यवहार करताना सखोल चौकशी करा. गुंतवणूक करतानाही कुटुंबाचा सल्ला घ्या.
कुंभ राशीच्या लोकांसाठीहीदेखील बुध ग्रहाचे गोचर शुभ ठरणार आहे. नोकरीच्या ठिकाणी चांगली संधी मिळू शकते. कामानिमित्त परदेशवारी करण्याची संधी मिळू शकते. 11 एप्रिलनंतर तरुण-तरुणींना चांगला जोडीदार मिळू शकतो. आई-वडिलांच्या आरोग्याची समस्या डोकं वर काढू शकते. त्यामुळे काळजी घ्या.
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.