विरार वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यान भीषण अपघात, अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू, पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा ठप्प
प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा March 26, 2026 10:43 PM

Virar Accident News :  विरार आणि वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यान भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. चेन्नई–अहमदाबाद एक्सप्रेससमोर अज्ञात व्यक्ती आल्याने गंभीर रेल्वे अपघात झाला आहे. या अपघातात संबंधित व्यक्ती गाडीच्या समोरील जाळीत अडकली. त्यामुळे एक्सप्रेस थांबवावी लागली. या अपघातात अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. 

या घटनेमुळे पश्चिम रेल्वेच्या डाऊन मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली. डहाणू व गुजरातकडे जाणाऱ्या अनेक गाड्या खोळंबल्या, तर काही लोकल गाड्याही मध्येच थांबवण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासन व अग्निशामक दलाने मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.  वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.