उन्हाळ्यामध्ये ताक पिण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. यामध्ये विटामिन बी 12, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आदी पोषक घटक असतात. ताक प्यायल्यामुळे शरीरातील पित्ताचे प्रमाण कमी होते. सध्या उन्हाची लाटेसम परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कित्येकजण उन्हातून आल्यावर किंवा जेवल्यावर ताक पित आहेत. ताक प्यायल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. पण, सतत फक्त मीठ टाकून ताक पिण्याचा कंटाळा आला असेल तर पाहूयात ताकाच्या वेगवेगळ्या रेसिपी .
पुदिना घ्या
पुदिना ताक हे गुजरातमधील प्रसिद्ध पेय आहे. यासाठी एक कप ताकात 1 वाटी पुदिन्याची पाने, बारीक चिरलेले आले आणि 1/2 चमचा जिरेपूड घालावं. आता ताक गाळून 5 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा आणि थंडगार ताकाचा आनंद घ्यावा.
लिंबाचा रस
दोन ते तीन चमचे घरी बनवलेले ताजे दही घ्यावे. त्यात ग्लासभर पाणी घालून चांगले फेटून घ्यावे. आता त्यात मीठ घालण्याऐवजी अर्ध्या लिंबाचा रस घाला आणि लगेचच प्यावे. यामुळे थकवा दूर होण्यास मदत होईल.
मसाला घ्या
मसाला ताक बनवण्यासाठी अर्ध्या कप दह्यात अर्धा चमचा जिरेपूड, चिमूटभर काळे मीठ, ताक मसाला आणि एक कप पाणी घालून चांगले एकजीव करून घ्यावे. यानंतर त्यात बर्फाचे तुकडे आणि चिरलेली कोथिंबीर घालावी. तयार झाले उन्हाळा स्पेशल मसाला ताक.
कडीपट्टा टाक
कडीपत्त्याचे ताक तयार करण्यासाठी कडीपत्त्याची पाने 8 ते 10 पाने, 1 कप दही, 1 ग्लास पाणी, 1 हिरवी मिरची, आल्याचा लहान तुकडा, 1 चमचा जिरे आणि चवीनुसार काळे मीठ लागेल. आता दही, पाणी, भाजलेले जिरे पावडर आणि काळे मीठ सोडून सर्वाची पेस्ट बनवून घ्यावी. तयार पेस्टमध्ये उरलेले साहित्य मिक्स करावे आणि चांगले फेटून घ्यावे. अशा पद्धतीने तयार झाले आहे कडीपत्ता ताक.
हेही वाचा –Summer Health Tips : उन्हाळ्यात ‘या’ भाज्या खाणे म्हणजे हायड्रेट राहणे