पैठण: जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणातील गोड्या पाण्यातील ताज्या मासळीला खवय्यांची मोठी पसंती असली, तरी बदलत्या हवामानाचा मोठा फटका सध्या मासेमारी व्यवसायाला बसत आहे. पहाटेचा गारठा आणि दुपारनंतर अचानक वाढणारा पारा यामुळे वातावरणात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, याचा थेट परिणाम मासळीच्या उपलब्धतेवर झाला आहे. परिणामी, बाजारपेठेत मासळीची आवक लक्षणीय घटली आहे.
सध्या तापमानात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत असल्याने मासळी पाण्याच्या तळाशी सरकत आहे. त्यामुळे मासे जाळ्याला लागत नसल्याची तक्रार मच्छीमारांकडून केली जात आहे. मासे शोधण्यासाठी वापरली जाणारी जाळी पाण्यात दीर्घकाळ टाकूनही अपेक्षित प्रमाणात मासळी मिळत नसल्याने, अनेकदा मच्छीमारांना रिकाम्या हाती किंवा अल्प साठ्यासह परतावे लागत आहे. ‘मासळी तळाला लागेना आणि गळाला येईना,’ अशी विदारक स्थिती नाथसागर परिसरात निर्माण झाली आहे.
Panchang 28 March 2026 : आजचे पंचांग! दशमी ते एकादशी विशेष; जाणून घ्या शुभ-अशुभ मुहूर्त अन् ग्रहस्थिती"तापमानातील वाढीमुळे नाथसागरातील मासळीवर परिणाम झाला असून ती खोलवर तळाशी जात आहे. सध्या धरणात पाणीसाठा मुबलक असल्याने मासळी पकडणे कठीण होत आहे. उन्हाची तीव्रता थोडी कमी होऊन हवामान स्थिर झाल्यास मासळीचे प्रमाण पुन्हा वाढेल."
- रमेश लिंबोरे, अध्यक्ष, गोदावरी मच्छीमार सहकारी संस्था, पैठण
Chhatrapati Sambhajinagar: वाहनधारकांची पेट्रोल पंपांवर झुंबड; ‘नो स्टॉक’चे बोर्ड; शेतीकामे, विवाह सोहळ्यांसह वाहतुकीला मोठा फटका"तापमानामुळे मासे पाण्याच्या तळाशी जाऊन बसत आहेत. सध्या दिवसाकाठी केवळ ४ ते ५ किलो मासे मिळत आहेत. खर्च पाहता हे परवडणारे नसले, तरी उदरनिर्वाहासाठी मिळेल तेवढी मासळी विक्री करावी लागत आहे."
- गोरखनाथ घटे,
मच्छीमार, नाथसागर धरण
आवक घटल्याने बाजारपेठेवर परिणामनाथसागरातील मासळीला स्थानिक बाजारपेठेसह जिल्ह्याबाहेरही मोठी मागणी असते. मात्र, आवक कमी झाल्याने खवय्यांची विशेष पसंती असलेली मासळी मिळेनाशी झाली आहे. उपलब्ध असलेल्या थोड्याफार मासळीवरच ग्राहकांना समाधान मानावे लागत असून, यामुळे मच्छीमारांच्या दैनंदिन उत्पन्नावरही परिणाम झाला आहे.