प्रसिद्ध मॉडेलसोबत घडलं भयंकर; रॅम्प वॉक करताना झाली Oops Momentची शिकार, तरीही थांबली नाही..VIDEO
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क March 28, 2026 01:43 PM

Model handles embarrassing moment confidently on stage: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल (Social Media) सांगता येत नाही. बऱ्याचदा सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ व्हायरल (Model Viral Video) होतात, ज्यामुळे कलाकारांची  लाजेनं मान खाली जाते. अनेकदा अभिनेता असो किंवा अभिनेत्री, असंख्य कलाकार Oops Momentची शिकार होतात. त्यांचे व्हिडीओही समाजमाध्यमांमध्ये जोरदार व्हायरल होतात.  या व्हिडींओवर नेटकरीही रिअॅक्ट होतात.  नुकतंच एका मॉडेलचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होतोय. लाइव्ह शोमध्ये मॉडेलसोबत असं काही झालं की, जे खरंच अनएक्सपेक्टेड होतं. परंतु, मॉडेलचं कौतुक करावं तितकं कमीच, कारण मॉडेलनं अगदी सहजपद्धतीने Oops Moment सांभाळला आहे. यामुळे त्या मॉडेलचं सोशल मीडियात प्रचंड कौतुक होत आहे. 

माहितीनुसार, नुकतंच  मिस ग्रँड थायलंड 2026चे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेत अनेक मॉडेल सहभागी झाले होते. या स्पर्धेत कमोलवन चानागो हिनं देखील सहभाग घेतला होता.  दरम्यान, या  स्पर्धेत मॉडेलसोबत Oops Momentचा प्रकार घडला. खरंतर मॉडेल कमोलवन चानागो स्टेजवर आपलं इन्ट्रोडक्शन देत होती.  स्वत:बद्दल माहिती देत असताना तिचे नकली दात पडले. परंतु, यावेळी मॉडेल घाबरली नाही.  संकोच न बाळगता तिनं या गोष्टीला आपली ताकद बनवली.  तिनं काही मिनिटांत स्वत:बद्दल माहिती देण्यास सुरुच ठेवले.  हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

स्टेजवर निघाले दात (Model Oops Moment video)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by The Urban Herald (@theurbanherald)

या व्हिडीओत मॉडेल कमोलवन चानागो स्वत:बद्दल प्रेक्षकांना माहिती देत असते. माहिती देत असताना तिचे नकली दात (डेन्टल फिक्स्चर)बाहेर पडतात. OOPSS मुव्हमेंट घडल्यानंतर तिनं ही परिस्थितीत उत्तमरित्या हाताळली, जे खरंच कौतुकास्पद आहे. मॉडेल मागे वळली,  तिनं आपले दात व्यवस्थित केले. नंतर ग्रेसफुली आपला रॅम्प वॉक पूर्ण केला. 

मॉडेलने हा क्षण उत्तमरित्या हाताळला. एका गोष्टीमुळे तिनं रॅम्प वॉक खराब होऊ दिला नाही.  कमोलवनचा रॅम्प वॉकचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एकाने कमेंटमध्ये, 'धमाकेदार कमबॅक' अशी कमेंट केली आहे.  तर, आणखी एका नेटकऱ्याने, 'किती सुंदर! एक अशी स्त्री जी आपल्या परिस्थितीचा पर्वा न करता, आत्मविश्वासाने  आपली स्वप्ने पूर्ण करत आहे'. सध्या मॉडेलचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.