Ashok Kharat : भोंदू खरातचे कारनामे संपेचना, चालवत होता हवाला रॅकेट ? खळबळजनक माहिती समोर
Tv9 Marathi March 28, 2026 11:45 AM

भोंदूगिरी करत अनेकांची फसवणूक करणारा, महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कारनाम्यांची लिस्ट लवाढतच चालली आहे. महिलेवर अत्याचाराच्या आरोखाली त्याला अटक करणय्ता आली होती, त्यानंतर अनेक महिलांशी अश्लील प्राकर केल्याच, तसेच भविष्य सांगत, ज्योतिषी बनत त्याने अनेकांची लुबाडणूक केल्याचा, पैसे कमावल्याचेही प्रकार उघड झाले. त्याच्या कार्यालयात येणाऱ्या महिलांचे शोषण, त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचा आरोपही अशोक खरातवर आहे. याप्रकरणातची व्आप्ती प्रचंड वाढली असून एसआयटीकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

याच तपासादरम्यान आता या भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड झालाय. भोंदू अशोक खरात हा हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परदेशात पैसा पाठवण्यासाठी खरात हा हवाल्याचा वापर करत होता. या पैशांची दुबईपर्यंत देवाण-घेवाण होत असल्याची माहितीदेखील उघड झाली असून खरातचे अनेक बडे भक्त व अधिकारी त्याला मदत करत असल्याचा संशयआहे. त्यामुळे खरातचे गुन्हे फक्त शोषण, फसवणुकीपर्यंत मर्यादित न राहता, आताहा आर्थिक गुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. याबाबत SIT ला सबळ पुरावे मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याच्या आणखीनच वाढू शकतात.

मी महादेवाचा अवतार असून माझ्याशी शरीरसंबंध ठेवल्यास तुझ्या वरील संकट दूर होणार

दरम्यान भोंदूगिरू करत महिलांना फसवणाऱ्या अशोक खरात विरोधात शुक्रवारी रात्री उशिरा आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका महिलेचे लैंगिक शोषण केलं तर एका इसमाची फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र भागवत (रा. नेवासा) या व्यावसायिकाला, व्यवसायिक बरकतीसाठी खरताने वेगवेगळ्या अंगठ्या लाखो रुपयांना विकल्या आणि त्याची फसवणूक केली, याप्रकरणी खरात विरोधात गुन्हा झाला आहे. तर एका विवाहित महिलेचा तिच्या पतीसोबत वाद होत असल्याने त्यावर सल्ला घेण्यासाठी गेली असता खरातने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार महिलेने केली आहे.

अशोक खरात विरोधात आत्तापर्यंत एकूण 10 गुन्हे नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यापैरू 2 आर्थिक गुन्हे फसवणुकीचे तर 8 गुन्हे लैंगिक शोषणाचे दाखल झाले आहेत. त्याने लैंगिक शोषणासाठी एकच मोडस वापरल्याचंही समोर आलंय. ‘मी महादेवाचा अवतार असून माझ्यासोबत शरीर संबंध ठेवल्यास तुझ्या वरील संकट दूर होणार आणि त्याला नकार दिल्यास तुझ्या कुटुंबातील मुलांचा आणि नवऱ्याचा मृत्यू होईल’ अशी धमकी देत आपलं लैंगिक शोषण केलं, असं पीडितेने तक्रारीत नमूद केलंय. अशोक खरात विरोधात तक्रारी आणि गुन्ह्यांचा ओघ सुरूच असून फोनद्वारे भोंदू अशोक खरात याच्या विरोधात 100 पेक्षा अधिक तक्रारी आल्या आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.