'बस करना बे', संजय दत्त पापाराझींवर भडकला; फॅमिलीसोबत रेस्टॉरंटमध्ये जात असताना काय घडलं?
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क March 28, 2026 08:43 PM

Sanjay Dutt angry reaction to paparazzi with family: 'धुरंधर 2:  द रिव्हेंज' (Dhurandhar 2) या चित्रपटाला ब्लॉकबस्टर यश मिळालं. रणवीर सिंहसह (Ranveer Singh) या चित्रपटातील कलाकार प्रकाशझोतात आले. संजय दत्तने (Sanjay Dutt) लियारी टास्क फोर्सचे एसएसपी  अस्लम चौधरीची भूमिका साकारली. संजय दत्तची भूमिका प्रचंड गाजली. संजय दत्त पडद्यावर आणि पडद्यामागे चर्चेत असतो.  संजय दत्त अलिकडेच मुंबईत पत्नी मान्यता दत्त आणि आपल्या मुलांसोबत स्पॉट झाला.  तो आपल्या फॅमिलीसोबत रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला होता. यावेळी पापाराझींनी  त्याच्या कुटुंबाभोवती घोळका घातला होता.  संजय दत्त पापाराझींवर भडकले.  तसेच जोरदार टीका केली.

मुंबईत संजय दत्त आपल्या फॅमिलीसोबत स्पॉट झाला होता. पत्नी मान्यता दत्त आणि जुळी मुलं शाहरान  -  इकरासोबत रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला होता. मात्र, यावेळी पापाराझींनी दत्त कुटुंबाभोवती घोळका घातला होता. पापाराझी सतत दत्त कुटुंबाचे फोटो आणि व्हिडीओ शूट करत होते.  यावेळी संजय दत्तने पापाराझींना रोखलं.  पण तरीही त्यांनी काही ऐकलं नाही. यावेळी संजय दत्त संतापला.  पापाराझींना   'बस करना बे' असं म्हटलं, तसेच संजय दत्त आपल्या फॅमिलीसोबत रेस्टॉरंटच्या आत निघून गेला.

यावेळी संजय दत्त पत्नी मान्यता दत्तचा हात पकडून घेऊन जात असल्याचं दिसून येत आहे.  रेस्टॉरंटमधून बाहेर आल्यानंतरही काही पापाराझी तिथेच उपस्थित होते.  पापाराझींनी संजय दत्त आणि त्याच्या कुटुंबावर कॅमेरा फिरवला. तेव्हा देखील संजय दत्त प्रचंड संतापला. तसेच पापाराझींना, 'अरे भाई 2 मिनट बंद कर दो..अभी हो गया', असं संजय दत्त संतापून म्हटला.  यावेळी संजय दत्त पापाराझींवर रागावला असल्याचं पाहायला मिळालं. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bollywood Reporter (@bollywoodreporter.in)

अलिकडेच संजय दत्त 'केडी द डेव्हिल' या चित्रपटातील गाण्यामुळे चर्चेत आला होता. या गाण्यात त्याच्यासोबत नोरा फतेही थिरकली.  या गाण्यामुळे दोघेही प्रचंड ट्रोल झाले होते.  गाण्यातील बोल अश्लील असल्याचं म्हटलं जात होतं. या गाण्यामुळेही संजय दत्तची प्रचंड चर्चा झाली. सध्या संजय दत्त धुरंधर 2 या ब्लॉकबस्टर सिनेमामुळे चर्चेत आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास,  संजय दत्त सध्या आपल्या आगामी प्रोजेक्ट्सच्या शुटिंगमध्ये प्रचंड व्यस्त आहे.  धुरंधर 2नंतर अभिनेता राजा शिवाजी,  बाप आणि केडी द डेव्हिल या चित्रपटात झळकणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.