काव्या मारन ही सन टीव्ही नेटवर्कची मालकीण कुलानिधी मारन यांची मुलगी आहे. ती आयपीएल संघ सनराईजर्स हैदराबाद ची सीईओ आहे. तिचा जन्म 1992 मध्ये झाला. काव्या नेहमी मैदानावर तिच्या संघाला प्रोत्साहन देताना दिसते. तिच्या दिलखेचक अदा आणि चेहऱ्यावरील भाव प्रेक्षकांना आवडतात. ती मैदानावर भाव खावून जाते.
तर अनन्या बिर्ला ही एक उद्योजिका आहे, आंतरराष्ट्रीय पॉप गायिका आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. ती आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी आहे. तिने अवघ्या 17 वर्षीच तिच्या करिअरला सुरुवात केली आणि अगदी कमी वयात स्वतःचे वलय तयार केली. ती अत्यंत ग्लॅमरस मानली जाते.
काव्या मारनचा लूक अत्यंत साधा, मनमोहक आहे. आयपीएल सामन्यात ती अनेकदा विना मेकअप अथवा कमी सौंदर्यप्रसाधनांचा वापर केलेली दिसते. तिच्या डोळ्याचे आणि चेहऱ्याचे हावभाव अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवतात. तिचे ड्रेस आणि गॉगल तर चारचांद लावतात. तिची स्टाईल नजर हटवत नाही.
28 मार्च रोजी आरसीबी आणि एसआरएच या दोन्ही संघात सामना होईल. मैदानात दोन्ही बाजूचे खेळाडू भिडतील. तर मैदानाबाहेर कॅमेऱ्याची नजर अनन्या आणि काव्या या दोघींवर असेल. त्यांच्या उत्कंठावर्धक आणि दिलखेचक अदा अनेकांना वेड लावतील